बहुजननामा ऑनलाईन
‘हाथरसची एक दलित मुलगी मृत्यूशी झुंज देत होती, तेव्हा आयुष्यमान आठवले नट्यांच्या घोळक्यात भलतेच उद्योग करत होते’, या शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या आरोपानंतर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी राऊत यांना प्रत्युत्तर दिले आहे. ‘दलित अत्याचारांच्या प्रश्नांवर नेहमी मूग गिळून बसणाऱ्या संजय राऊत यांनी आम्हाला दलित अत्याचारा विरुद्ध लढण्याचं शिकवू नये’, असा टोला रामदास आठवलेंनी लगावला आहे.

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी वार्ताहरांशी संवाद साधताना म्हटलं की, संजय राऊत हे नटींच्या घोळक्यात असतात की नाही ते माहिती नाही. मी नटींच्या घोळक्यात नसतो, मी मात्र कार्यकर्त्यांच्या घोळक्यात असतो. हाथरसची घटना घडली तेव्हा मुंबईत राज्यपालांची पूर्वनियोजित भेट होती. ती भेट झाल्यानंतर आम्हाला हाथरसाच्या घटनेची माहिती मिळताच त्या अमानुष घटनेचा आम्हीत तीव्र निषेध नोंदवला. तेथील जिल्हा प्रशासनाने सर्वच पक्षाच्या नेत्यांना भेट देण्यापासून रोखले होते. मात्र, आता उद्याच हाथरसला जाऊन पीडित मुलीच्या कुटूंबीयांची भेट घेणार असल्याचं, आठवले यांनी सांगितलं.
दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे कलावंताची कदर करणारे नेते होते. कंगना राणौत प्रकरणात आम्ही कधीही संजय राऊत यांच्यावर टीका केली नाही ते आमच्यावर टीका करत असले तरी त्यातून मी त्यांच्यावर नाराज नाही. ते माझे मित्र आहेत. दलितांच्या प्रश्नांवर आम्ही नेहमी लढत आलो आहोत पण संजय राऊत हे कधी सामनामधूनही दलित अत्याचाराच्या प्रश्नावर व्यक्त झाले नाहीत, असा आरोप यावेळी बोलताना आठवलेंनी केला.
तसेच संजय राऊत यांनी आजपर्यंत कधीही दलित अत्याचारविरुद्ध ब्र शब्द काढला नाही. दलित अत्याचाराविरुद्ध कधी ते पुढे आले नाहीत. दलित अत्याचार होईल तेथे मी पोचलेलो आहे. दलित अत्याचाराविरुद्ध सतत लढत राहिलो आहे. दलित पँथरच्या चळवळीतून मी पुढे आलो आहे. त्यामुळे दलित अत्याचारांच्या प्रश्नांवर नेहमी मूग गिळून बसणाऱ्या खासदार संजय राऊतांनी आम्हाला दलित अत्याचाराविरुद्ध लढण्याचं शिकवू नये, असा घणाघात आठवलेंनी सोडला.