मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – गोरेगाव कथित पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी (Patrachal Land Scam) अटकेत असलेले शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे-Shivsena Uddhav Balasaheb Thackeray) पक्षाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांची आज न्यायालयात सुनावणी होती. यावेळी योगायोगाने राष्ट्रवादीचे आमदार(NCP MLA) एकनाथ खडसे (Eknath Khadse) आणि संजय राऊत (Sanjay Raut) यांची भेट झाली. या भेटीचा किस्सा एकनाथ खडसेंनी सांगितला आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
राऊत (Sanjay Raut) आणि खडसे यांची न्यायालयासमोर भेट झाली. यावेळी एकनाथ खडसेंनी त्यांच्या तब्येतीची चौकशी केली. राऊत मला म्हणाले, मी लवकरच बाहेर येणार आहे. सर्व काही ओके आहे. तुम्ही कोणतीच चिंता करु नका, असे एकनाथ खडसेंनी सांगितले.
संजय राऊत यांनी गोरेगाव कथित पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणांत जामिनासाठी अर्ज (Bail Application) केला आहे. त्यांच्या अर्जावर आणि नियमित सुनावणीवर आज न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने राऊतांच्या जामीन अर्जाची सुनावणी पुढे ढकलली आहे. पुढील सुनावणी 21 ऑक्टोबरला होणार आहे.
संजय राऊत यांचे धाकले बंधू प्रवीण राऊत (Pravin Raut) यांची गुरु आशिष कंन्स्ट्रक्शन
(Guru Ashish Construction) नामक एक बांधकाम कंपनी आहे.
गोरेगाव पत्राचाळीतील रहिवाश्यांनी या कंपनीला पुर्नविकासाचे काम दिले होते.
ह्यात प्रवीण राऊत यांनी मोठ्या प्रमाणात पैश्यांचा अपहार केला आणि ते पैसे त्यांच्या नातेवाईकांच्या खात्यावर टाकले, असा त्यांच्यावर आरोप आहे.
तसेच त्यातील 55 लाख रुपये संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत (Varsha Raut) यांच्या खात्यावर देखील आले होते.
त्यामुळे संजय राऊत यांनी पीएमएलए (Prevention of Money Laundering Act) कायद्यांतर्गत सक्तवसुली
संचलनालयाने अटक (Enforcement Directorate) केली आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Sanjay Raut | mp sanjay raut and eknath khadse met in front of the court today
हे देखील वाचा :
Nitesh Rane | आमच्यावर भुंकण्यासाठी भटकी कुत्री, सोंगाडे आणले, नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
MIM MP Imtiyaz Jaleel | संजय शिरसाटांना आला हृद्यविकाराचा झटका; इम्तियाज जलील यांनी सांगितले राजकारण