Sanjay Rathod | शिवसेनेचे आमदार संजय राठोड पत्नीचा शब्द धूडकावून गुवाहाटी दाखल

 Sanjay Rathod | shivsena thackeray and shinde group mla in contact says sanjay rathod

मुंबई : बहुजननामा ऑनलाइनSanjay Rathod | शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मोठी भूमिका घेतल्याने राज्यातील वातावरण ढवळून निघालं आहे. सध्या शिंदे गटात 42 आमदार असल्याचा दावा करण्यात आला. त्यामुळे शिंदे गटाकडून जोरदार शक्तीप्रदर्शनही केले. त्यानंतर आज आमदार संजय राठोडही (Sanjay Rathod) गुवाहाटीला गेले असल्याची चर्चा आहे. दरम्यान त्यांच्या घरात तणाव निर्माण झाला आहे. राठोड यांच्या पत्नींना रुग्णालयात दाखल केले आहे. संजय राठोड यांनी पक्ष सोडू नये अशी शितल राठोड (Shital Rathod) यांची इच्छा होती. मात्र हा विरोध धूडकावून ते गुवाहाटी येथे शिंदे गटात गेले आहे.

 

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

 

सध्या संजय राठोड (Sanjay Rathod) यांच्या पत्नी शितल राठोड यांना रुग्णालयात भरती करण्यात आलेय. पत्नी शितल यांना बीपीचा त्रास सुरु झाल्याने जे. जे. रुग्णालयात (J.J. Hospital) दाखल करण्यात आले आहे. दरम्यान मागील काही दिवस संजय राठोड हे घरुन नॉट रिचेबल होते. त्यानंतर एकनाथ शिंदेचा प्रस्ताव घेवून संजय राठोड रवाना झाल्याने शितल राठोड यांना धक्का बसला आहे. काल दिवसभर संजय राठोड जे. जे. रुग्णालयात होते. आज ते गुवाहाटीसाठी रवाना झाल्याची माहिती आहे. संजय राठोड यांनी पक्ष सोडू नये, अशी शितल यांची इच्छा होती. मात्र, राठोड यांनी गुवाहाटी गाठल्याने पत्नी नाराज असल्याची माहिती समोर येत आहे.

 

दरम्यान, शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत अपक्षांसह 40 ते 42 आमदार असल्याचा दावा करण्यात येत आहे.
आज संजय राठोड, दादा भुसे (Dada Bhuse), रविंद्र फाटक (Ravindra Phatak) गुवाहाटीच्या दिशेने रवाना झाल्याची माहिती पसरली आहे.
त्यामुळे शिंदे गट अधिक मजबूत होताना दिसत आहे.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

Web Title :- Sanjay Rathod | shivsena mla sanjay rathore broke his wifes word and reached guwahati

 

हे देखील वाचा :

Sanjay Raut | 21 आमदारांशी संपर्क ! विजय महाविकास आघाडीचा असेल; संजय राऊतांच्या एकाचवेळी दोन भूमिका

Nana Patole On Ajit Pawar | काँग्रेसचा उप मुख्यमंत्र्यांवर मोठा आरोप, म्हणाले – ‘अजित पवार शिवसेनेच्या आमदारांना त्रास द्यायचे’

Sanjay Raut | संजय राऊतांचे सूचक ट्विट, म्हणाले – ‘गुलामी पत्कारण्यापेक्षा स्वाभिमानाने निर्णय घेऊ’