नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारताची प्रसिद्ध महिला टेनिस खेळाडू सानिया मिर्झा त्या लोकांमध्ये सहभागी आहे जे नेहमी रूढी-परंपरांना तोडत पुढे जातात. एक स्त्री एकसोबत खूप वेगवेगळे भूमिका सांभाळत असते. सानिया मिर्झाने एक फोटो ट्विटरवर शेअर केला असून त्यात ती आपला मुलगा इजानला कडेवर घेत टेनिस कोर्टात उतरली आहे.
https://twitter.com/MirzaSania/status/1237790308160532482
फोटोमध्ये एका हातात तिने रॅकेट आणि कडेवर मुलाला घेतले असून हा फोटो शेअर करत तिने लिहिले आहे की, एका फोटोमध्ये माझं आयुष्य आहे, माझ्याकडे दुसरी कोणती पद्धत नाही. अलहमदुलिल्लाह, हे इंडोनेशियाविरुद्ध खेळण्याच्या काही वेळ अगोदरचे आहे. याने मला खूप प्रेरित केले, मी जे करते ते करायला आणि सर्वोत्कृष्ट बनण्यासाठी.
सानियाचा फोटो झाला व्हायरल, लोकं म्हणाले…
सानियाचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून लोकांनी देशाच्या या मुलीला सलाम करत तिला बहू प्रतिभावान म्हटले आहे. तर अभिनेता रितेश देशमुखने सानियाच्या या फोटोला रिट्विट करत ‘परफेक्ट पिक्चर’ असे लिहिले आहे. रितेशच्या या ट्विटवर अनेक प्रतिक्रियाही आल्या आहेत.
रितेश देशमुख म्हणाला परफेक्ट फोटो…
असे म्हटले जाते की, सानिया मिर्झाने पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिकसह आठ वर्षांपूर्वी २०१० मध्ये लग्न केले होते. हे लग्न सोपे नव्हते. कारण सानिया भारतीय तर शोएब हा पाकिस्तानी आहे. त्यामुळे या नात्याबाबत खूप चर्चा झाली होती.
Picture Perfect!!!! Love to Izzy https://t.co/TJyJKEODQ2
— Riteish Deshmukh (@Riteishd) March 11, 2020
दोघांनी मिळून केला सामना
पण सानिया- शोएबने प्रत्येक विरोधाचा सामना केला आणि लोकांना दाखवून दिले की, जिथे प्रेम आणि विश्वास आहे तिथे केवळ प्रेमच असते. सानिया – शोएबच्या घरी आलेला छोटा पाहूणा याचे साक्षात उदाहरण आहे.