सांगोला न्यूज : बहुजननामा ऑनलाईन – Sangola Accident । सांगोला (Sangola) तालुक्यातील कारंडेवाडी (Karandewadi) फाट्याजवळ एक भीषण अपघात झाला आहे. मालवाहतूक ट्रकने कारला (Truck-Car Accident) समोरून जोरात धडक दिल्याने झालेल्या अपघातात (Accident) कार चालकासह 2 लहान मुलींचा मृत्यू (three died) झाला आहे. तसेच अन्य 9 जण जखमी झाले आहेत. ही घटना रविवारी (1 ऑगस्ट) रोजी सायंकाळी सातच्या दरम्यान घडली आहे. चालक दाजीराम लक्ष्मण शिंगाडे (रा. उदनवाडी, ता. सांगोला) आणि प्रवासी कावेरी मनोज हरीजन (वय 7, रा. निरलगी, ता. ताळेकोटी, जि. विजापूर), गुड्डी चंद्रकांत मगिरी (वय 8, रा. कोंडगोडी, ता. जेवरगी, जि. गुलबर्गा) हे 3 जण ठार झाले आहेत.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
अधिक माहितीनुसार, रविवार 1 ऑगस्ट रोजी सांयकाळी 7 वाजण्याच्या सुमारास कार चालक दाजीराम लक्ष्मण शिंगाडे हा ओम्नी (VAN) कारमधून उदनवाडी (झापाचीवाडी, ता. सांगोला) येथून 3 पुरुष,
3 महिला, 6 लहान मुलांना घेऊन कर्नाटक येथील सिंदगी येथे जात होता.
करांडेवाडी फाट्याजवळ उजव्या बाजूला असणाऱ्या सर्व्हिस रोडने जात असताना
समोरुन भरधाव वेगाने येणाऱ्या मालवाहतूक ट्रकची कारला समोरुन जोरात धडक बसली.
या दरम्यान, या जोराच्या झालेल्या अपघातामध्ये (Accident) ओम्नी (VAN) चालक दाजीराम शिंगाडे (Dajiram Shingade) आणि प्रवासी कावेरी मनोज हरीजन (Kaveri Manoj Harijan,),
गुड्डी चंद्रकांत मगीरी (Guddi Chandrakant Magiri) हे तिघे गंभीर जखमी झाले, यांनंतर त्याचा मृत्यू झाला आहे.
कारमधील अन्य लोक आणि लहान मुले असे एकूण 9 जण जखमी झाले आहेत.
दरम्यान, याप्रकरणी मालवाहतूक ट्रक चालकाविरुद्ध माणिक शिंगाडे (रा. उदनवाडी,) यांनी फिर्याद दिलीय.
Web Title : Sangola Accident | terrible accident near karandewadi three killed including two girls in sangola taluka of solapur district
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Coronavirus | ‘कोरोना’चा उगम झाला ‘त्या’ वुहानमधील 1.10 कोटी रहिवाशांची चीन करणार पुन्हा Test
PM Shram Yogi Man Dhan pension | रोज 2 रुपये जमा करून मिळवा 36000 रुपये पेन्शन, जाणून घ्या डिटेल