शेतमजुराची धारदार शस्त्राने वार करून हत्या

Pune Crime | Murder of two persons for allegedly harassing a supposed sister in Vishrantwadi area Seeing that one was pushed the other was also killed

सांगली/ कडेगांव : बहुजननामा ऑनलाईन – कडेगांव तालुक्यातील तडसर Tadsar येथील गावात एका शेतमजुराचा हत्याराने डोक्यात वार करून हत्या Murder करण्यात आली आहे. धनाजी भीमराव कोळी (वय, ४५, रा. कुंडल, पलूस) असे शेतमजुराचे नाव आहे. ही घटना बुधवारी दुपारच्या दरम्यान घडली आहे. संशयित आरोपी फरारी असून याबाबत चिंचणी- वांगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक माहिती अशी, कुंडलमधील शेतमजूर धनाजी कोळी हे तडसर Tadsar या गावी काम करत होते, बुधवारी साधारण दुपारच्या दरम्यान त्यांचा मृतदेह आढळून आला. तेथील माळी वस्तीतल्या उसाच्या शेतात त्यांचा खून Murder झाला आहे. धनाजी कोळी यांच्या उजव्या कानाच्या मागे डोक्यात आणि कपाळावर समोरील बाजूस धारदार शस्त्राचे वार झाला आहे. याबाबत माहिती कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तानाजी ज्ञानू कोळी (रा. कुंडल) यांनी फिर्याद दिली आहे. हत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून चिंचणी वांगी पोलीस याचा शोध घेत आहेत.

कृपया हे देखील वाचा:
पुणे महापालिकेत महापौर अन् सभागृहनेते यांच्यात ‘खडाजंगी’?, राजकीय वर्तुळात चर्चा

8 वर्षाच्या मुलाकडून साफ करून घेतले कोरोना रूग्णांचे टॉयलेट, वायरल झाला व्हिडीओ

Microsoft 24 जूनला सादर करणार नवीन Windows, जाणून घ्या काय असू शकते खास

आगामी निवडणुकासाठी काँग्रेसचा स्वबळाचा नारा !

फायजर-मॉडर्नानंतर आता सीरमने मागितली कायदेशीर कारवाईतून सूट, म्हटले – ‘सर्वांसाठी असावा एकच नियम’