Sangli Crime | सांगलीच्या म्हैसाळमध्ये एकाच कुटुंबातील 9 जणांचा संशयास्पद मृत्यू, आत्महत्या की विषबाधा?
मिरज : बहुजननामा ऑनलाइन– Sangli Crime | सांगली जिल्ह्यातील मिरज (Miraj) तालुक्यातील म्हैसाळ येथे एकाच कुटुंबातील 9 जणांचे मृतदेह आढळून आले आहेत. मिरज पासून 12 किमी अंतरावर असणाऱ्या म्हैसाळ मधील अंबिकानगर मध्ये ही घटना घडली आहे. परंतु सर्वांचा मृत्यू हा विषबाधेने (Poisoning) झाला की त्यांनी आत्महत्या (Family Commits Suicide) केली, याची माहिती मात्र समजू शकली नाही. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. कुटुंबाने आर्थिक विवंचनेतून सामूहिक आत्महत्या (Sangali Crime) केल्याची चर्चा आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
मिळालेल्या माहितीनुसार, मिरज तालुक्यातील म्हैसाळ (Mhaisal) येथे रविवारी (दि.19) रात्री एकाच कुटुंबातील नऊ जणांनी जीवन संपलं. माणिक वनमोरे (Manik Vanmore) आणि पोपट वनमोरे (Popat Vanmore) या दोन भावांनी आपल्या कुटुंबासहित आत्महत्या केली. यामध्ये आई, पत्नी आणि मुलांचाही समावेश आहे. सोमवारी (दि.20) सकाळी मृतदेह आढळून आल्यानंतर ही घटना उघडकीस आले. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.(Sangli Crime)
माणिक वनमोरे आणि पोपट वनमोरे हे दोघे वेगवेगळ्या घरात राहत होते. दोघांनी आपल्या कुटुंबासह एकाच वेळी आत्महत्या केली.
एका ठिकाणी सहा जणांचे तर दुसऱ्या ठिकाणी तिघांचे मृतदेह आढळून आले.
माणिक वनमोरे हे पशुवैद्यकीय डॉक्टर (Veterinary Doctor) होते. आज सकाळी त्यांच्यासह कुटुंबातील कोणीही मोबाईल उचलला नाही.
ग्रामस्थांना शंका आल्यानंतर घरात जाऊन पाहिले असता मृतदेह आढळून आले.
या सर्वांचा मृत्यू हा विषबाधेतून झाला की त्यांनी आत्महत्या केली हे मात्र समजू शकले नाही.
घटनास्थळी मिरज ग्रामीण पोलिसांचे (Miraj Rural Police) पथक दाखल झाले आहे.
मृतांची नावे
माणिक येलाप्पा वनमोरे (डॉक्टर), अक्काताई वनमोरे (आई), रेखा माणिक वनमोरे (पत्नी), प्रतिभा वनमोरे (मुलगी), आदित्य वनमोरे (मुलगा)
पोपट येलाप्पा वनमोरे (शिक्षक), अर्चना वनमोरे (पत्नी), संगीता वनमोरे (मुलगी), शुभम वनमोरे (मुलगा)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Sangli Crime | suspicious death of nine members of the family in maisal miraj sangli may be suicide or food poisoning
हे देखील वाचा :
Comments are closed.