सांगली : बहुजननामा ऑनलाइन– Sangli Crime | सांगली जिल्ह्यातील एक धक्कादायक घटना (Sangli Crime) समोर आली आहे. येथील जत तालुक्यात प्रेमीयुगुलाने (lover) विषप्राशन करून आत्महत्या (Suicide In Sangli) केल्याची घटना घडली आहे. प्रियकर लक्ष्मण संभाजी शिंदे (Laxman Sambhaji Shinde) (वय, 22) नवविवाहिता अश्विनी जगन्नाथ माळी (Ashwini Jagannath Mali) (वय, 21) अशी आत्महत्या केलेल्या प्रेमीयुगुलाचे नावे आहेत. ही घटना सोमवारी सकाळच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
लक्ष्मण शिंदे आणि अश्विनी माळी या दोघांचे मागच्या काही वर्षापासून एकमेकांवर प्रेम होते. पण, 1 जून रोजी अश्विनीचा विवाह मिरज तालुक्यातील सलगरे येथील एका युवकांशी झाला होता. दरम्यान अश्विनीचे दुसऱ्या तरुणावर (लक्ष्मण) प्रेम असल्याने तिला हा विवाह पसंत नव्हता. (Sangli Crime)
अधिक माहितीनुसार, जत तालुक्यातील एकुंडी या गावी पाच दिवसानंतर अश्विनी आली होती.
सोमवारी या दोघांनीही आपापल्या घरी विषारी औषध प्राशन करून आपली जीवनयात्रा संपवली आहे.
दरम्यान, आत्महत्या करण्याआधी फोन करून हा निर्णय घेतला असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.
दोघांनी विषारी औषध प्राशन केल्याचे दोघांच्याही घरच्या लोकांना समजताच तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मात्र, त्याआधी त्यांचा मृत्यू (Died) झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत जत पोलिस (Jat Police) तपास करीत आहेत.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Sangli Crime | suicide of a married woman and boyfriend on the sixth day after marriage jat police station limits
हे देखील वाचा :
Kupwara Encounter Updates | भारतीय लष्कराची मोठी कारवाई ! चकमकीत 3 अतिरेक्यांचा खात्मा
Maharashtra 12th Result 2022 | अखेर इयत्ता 12 वी च्या निकालाची तारीख जाहीर, जाणून घ्या