सांगली : बहुजननामा ऑनलाइन – Sangli Crime | तीन महिन्याच्या पाळीव कुत्र्याचे दोन्ही कान मुळातून कापून (cut off ears) त्याच्या नैसर्गिक ठेवणीत बदल केल्याप्रकरणी सांगलीतील (Sangli Crime) एका डॉक्टर विरोधात गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. डॉ. सुनिल कोल्हे Dr. Sunil Kolhe (रा. राजपूत कॉलनी, समृद्धीनगर) यांच्यावर सांगलीतील (Sangli Crime) संजयनगर पोलीस ठाण्यात (Sanjaynagar Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी प्राणीप्रेमी ओंकार सूर्यवंशी Omkar Suryavanshi (रा. सह्याद्रीनगर) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी डॉबरमॅन कुत्रा (Doberman dog) पाळला आहे. दोन महिन्यापूर्वी सकाळच्या सुमारास तो कुत्रा घेऊन फिरायला जात होते. तेव्हा मंगळवार बाजार येथील कोल्हे क्लिनिकचे डॉ. सुनिल कोल्हे यांची ओळख झाली.
डॉ. कोल्हे यांनी ओंकारला तुझ्या कुत्र्यासारखा डॉबरमॅन जातीचा पाळीव कुत्रा पाहिजे असल्याचे सांगितले. त्यामुळे फिर्यादी यांनी यशवंतनगर येथील संजय तुपे यांच्याकडी एक पिल्लू 15 हजार रुपयांना विकत घेऊन कोल्हे यांना दिले.
Join our Whatsapp Group, Telegram,
and facebook page for every update
दरम्यान, गुरुवारी ओंकार यांचा मित्र अथर्व शिंदे याने फोन करुन डॉ. कोल्ह याने पाळीव कुत्र्याचे कान क्लिनिकमध्ये कशाने तरी कापल्याचे सांगितले. त्यामुळे ओंकार यांनी जाऊन पाहणी केली असता कुत्र्याचे दोन्ही कान मुळातून कापल्याचे दिसले. ओंकार याने सांगलीतील (Sangli Crime) प्राणिमित्र अजित काशिद व कौस्तुभ पोळ यांना हा प्रकार सांगितला. त्यानंतर ओंकार याने पोलीस ठाण्यात धाव घेत डॉ. कोल्हे विरोधात गुन्हा (Sangli Crime) दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस कर्मचारी असिफ सनदी (Asif Sanadi) करीत आहेत.
Web Title : Sangli Crime | Dr. sunil kolhe who cut off both ears of a 3-month-old ‘Doberman’ dog. FIR on Dr. Sunil Kolhe in sangli
Uddhav Thackeray | … म्हणून भाजप खासदाराने मानले CM उद्धव ठाकरे यांचे आभार
Parambir Singh | परमबीर सिंह यांच्याबाबत राज्य सरकारनं घेतली भूमिका; तडकाफडकी नाही होणार ‘ही’ कारवाई
Ajit Pawar | दुसरा डोस घेतलेल्यामध्ये कोरोना होण्याचे प्रमाण जास्त, अजित पवारांनी सांगितले कारण
LIC Mobile Notification | एलआयसी पॉलिसीधारकांनी या पध्दतीनं अपडेट करावेत डिटेल्स, अन्यथा…
Anil Deshmukh | 100 कोटींचे कथित वसुली प्रकरणी आता ‘त्या’ 2 बडया व्यक्तींना सीबीआयचे ‘समन्स’
Ajit Pawar | मुलांना शाळेत पाठवण्याची पालकांची मानसिकता नाही – उपमुख्यमंत्री अजित पवार