मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – राज्यातील लोण कोल्हापुरातही राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भारतीय जनता पक्षात जाणार असे समोर येते आहे. चंदगडच्या ‘राष्ट्रवादी’च्या आमदार श्रीमती संध्यादेवी कुपेकर या देखील राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भारतीय जनता पक्षात जाणार. १० ऑगस्टपर्यंत कार्यकर्त्यांशी चर्चा झाल्यानंतर हा निर्णय घेतला जाणार आहे. श्रीमती कुपेकर यांनी ‘राष्ट्रवादी’ला रामराम केलाच तर त्यांच्या कन्या डॉ. नंदिनी बाभूळकर भाजपच्या उमेदवार म्हणून रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.
महिन्याभरापासून श्रीमती कुपेकर राष्ट्रवादी काँग्रेस सोडणार, अशी चर्चा सुरू आहे. नुकत्याच ‘राष्ट्रवादी’ ने इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. या मुलाखतीत श्रीमती कुपेकर यांनी सांगितले की, निवडणूक लढणार नसल्याचे अप्रत्यक्षपणे सांगितले आणि त्यानंतर त्यांच्या भाजपमध्ये प्रवेश घेण्याच्या चर्चा सुरु झाल्या. ‘राष्ट्रवादी’चे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांचे विश्वासू सहकारी अशी (कै.) बाबासाहेब कुपेकर यांची ओळख होती. त्यांच्या घरातून ‘राष्ट्रवादी’ सोडण्याची तयारी सुरू झाल्याने पक्षाला मोठा धक्का समजला जातो.
भाजप- शिवसेना युती झाली तर हा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला येणार आहे. सध्या शिवसेनेच्या वाट्याला जिल्ह्यातील दहापैकी सहा मतदारसंघ येणार. उर्वरित चारपैकी दोन मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत. उर्वरित दोन्हीही जागा भाजप आपल्याकडे घेण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आघाडीवर आहेत. त्यातून ही जागा भाजपला मिळाली तर श्रीमती कुपेकर यांच्या कन्या डॉ. बाभूळकर या उमेदवार असतील.