नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सॅमसंगचा पॉप्युलर ट्रिपल कॅमेरा स्मार्टफोन गॅलॅक्सी M30s ला अॅमेझॉनवर आतापर्यंत सर्वात चांगल्या किंमतीत उपलब्ध करून देत आहेत. फोनच्या डिस्काउंट ऑफरसह एक्सचेन्ज ऑफरही दिली जात आहे, अशी माहिती अॅमेझॉनकडून मिळत आहे.अॅमेझॉनच्या साइटवर ‘lowest price ever’ असे लिहिले असून आतापर्यंतच्या सर्वात कमी किंमतीत सादर केला गेला आहे. हा फोन १५ हजार रुपयांऐवजी फक्त १२,९९९ रुपयात खरेदी करू शकता. याशिवाय एक्सचेन्ज ऑफरअंतर्गत यावर १०,५५० रुपयांची सूटही मिळणार आहे. तसेच जर तुम्ही फोन खरेदी करण्यासाठी HSBC कॅशबॅक कार्डचा वापर केला तर तुम्हाला ५% इन्स्टंट डिस्काउंट मिळेल.
फोनचे खास फीचर्स
सॅमसंग गॅलॅक्सी M30 मध्ये ६.४ इंचाचा फुल-एचडी इन्फिनिटी यू डिस्प्ले आहे. फोनची स्क्रीन ते बॉडी रेशियो ९१ टक्के असून फोनमध्ये ऑक्टा-कोर एक्सीनोस ९६११ प्रोसेसर वापरला आहे. तसेच फोनमध्ये ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेजसह आहे.
कॅमेरा
या फोनमध्ये तीन रियर कॅमेरे असून ४८ मेगापिक्सेलचा प्रायमरी सेन्सर आहे. हे एफ / २.० अपर्चर लेन्ससह येते. यात ५ मेगापिक्सलचा डेप्थ कॅमेरा आणि ८ मेगापिक्सल अल्ट्रा-वाइड एंगल लेन्स आहे. या फोनचा फ्रंट कॅमेरा १६ मेगापिक्सलचा असून ६ हजार एमएएच बॅटरी 15W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येते.