बुलढाणा :बहुजननामा ऑनलाईन – Samruddhi Mahamarg Accident | जिल्हयातील सिंदखेडराजा (sindkhed raja) तालुक्यातील दुसरबीड येथून मजूरांना घेऊन समृध्दी महामार्गाच्या (Samruddhi Mahamarg Accident) कामावर जाताना झालेल्या अपघातात 12 जणांचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे.
समृध्दी महामार्गावर हा भीषण अपघात झाला आहे. लोखंडी सळई घेवुन जाणारा ट्रक पलटी झाल्याने हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
समृध्दी महामार्गावर (Samruddhi Mahamarg Accident) काम करणार्या बिहारी मजूरांची मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. सिंदखेडराजा तालुक्यातील तळेगाव येथे हा भीषण अपघात झाला आहे. जखमी झालेल्यांना रूग्णालयात दाखल करण्यासाठी पाठविण्यात आले आहे. ट्रकमध्ये 15 मजूर होते त्यापैकी 12 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अपघातानंतर पोलिस आणि इतरांनी बचावकार्यास सुरूवात केली आहे.
Gold Price Today | सोन्याच्या दरात तेजी येऊनही 9 हजारांनी ‘स्वस्त’, चांदी महागली; जाणून घ्या आजचे दर
Parambir Singh | परमबीर सिंग यांच्या अडचणी वाढ; मरिन ड्राइव्ह पोलीस ठाण्यातील गुन्हाही सीआयडीकडे?
MP Amol Kolhe | दोन्ही डोस घेतल्यानंतरही खा. डॉ.अमोल कोल्हे ‘कोरोना’ पॉझिटिव्ह