सातारा : बहुजननामा ऑनलाईन – मराठा आरक्षणाच्या मुद्यावर खासदार संभाजीराजे sambhaji raje यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. पण संभाजीराजे sambhaji raje हे माझे धाकटे भाऊ आहेत. आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत, असे स्पष्टपणे भाजप BJP खासदार उदयनराजे भोसले यांनी सांगितले.
ही दुर्दैवी बाब
मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टात (Supreme Court) स्थगिती दिली आहे. हे सरकारचं अपयश आहे. आज मराठा मुद्यावर आंदोलन करण्याची वेळ आली आहे, हे दुर्दैवाची बाब आहे, सरकारने लवकरात लवकर भूमिका जाहीर करावी, अशी मागणी उदयनराजे यांनी केली.
तर त्यासाठी राज्यकर्ते जबाबदार
मराठा समाजातील लोक हे लोकांनी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींकडे डोळे लावून बसले आहेत. त्यामुळे उद्या जर लोकांचा उद्रेक झाला तर याला राज्यकर्ते जबाबदार असतील. मराठा आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावण्यासाठी अधिवेशन बोलवण्याची गरज आहे, अशी मागणी त्यांनी केली.
जीआर काढून आरक्षण द्या
मराठा समाजाला इतर कोणत्याही जातीचे आरक्षण देऊ नका, मराठा समाजासोबत भेदभाव करु नका, जीआर काढून आरक्षण द्या, गायकवाड समितीचा अहवाल नीट वाचन झाले नाही. त्यामुळे सुप्रीम कोर्टाने हा निर्णय दिला असावा, असेही उदयनराजे भोसले म्हणाले.