Sambhaji Raje Chhatrapati At Bhau Rangari Ganpati | छत्रपती संभाजीराजेंनी घेतले श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचे दर्शन; म्हणाले – ‘पुण्यातील गणेशोत्वाच्या वातावरण निर्मितीसाठी पुनीत बालन यांचा हातभार, त्यांच्या कार्यास मनापासुन शुभेच्छा’ (Videos)

पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Sambhaji Raje Chhatrapati At Bhau Rangari Ganpati | शहरात गणेशोत्सवाचा उत्साह आणि जल्लोष पाहायला मिळतोय. त्यामुळे शहरात गर्दी वाढत आहे. दरम्यान, छत्रपती संभाजीराजे यांनी श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट (Shrimant Bhausaheb Rangari Ganpati) येथे भेट देऊन बाप्पांचे दर्शन घेऊन आरती केली. यावेळी उत्सव प्रमुख व विश्वस्त पुनीतदादा बालन (Punit Balan) यांच्याकडून छत्रपती संभाजीराजे यांचे स्वागत करत त्यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी माध्यमांशी बोलताना छत्रपती संभाजीराजे म्हणाले, हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती’
बाप्पाचे दर्शन घेण्याचे भाग्य मला लाभले. गणेशोत्वादरम्यान संपूर्ण पुण्यात वातावरणनिर्मिती करण्यासाठी पुनीत बालन यांचा हातभार आहे. त्यांच्या कार्याला माझ्या मनापासून शुभेच्छा आहेत. पुण्यातलं एक वेगळं प्रेम, महाराष्ट्राची संस्कृती आहे. गणपती बाप्पा मोरया म्ह्णून आम्ही सगळे पुढे चाललोय.
बाप्पाकडे काय मागितलं यावर ते म्हणाले, आपण सगळेजण आनंदात राहुयात. महाराष्ट्र घडवुयात. हिंदुस्थानातील पहिला गणपती इथं बसला त्यानंतर पूर्ण महाराष्ट्रभर, जगभर हे चित्र आपणाला पाहायला मिळतेय. हे अजून वाढावं त्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करूया, असेही छत्रपती संभाजीराजे यांनी सांगितलं.
Comments are closed.