मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – बॉलीवुड अभिनेता सलमान खानबाबत (Salman Khan) खळबळजनक बातमी समोर आली आहे. काल रात्री सलमान खानला (Salman Khan) सापाने दंश केला आहे. ही घटना त्यावेळी घडली, जेव्हा सलमान खान पनवेलच्या फार्म हाऊसवर होता. मात्र, सलमानची प्रकृती आता ठिक असल्याचे सांगितले जात आहे. त्याला रात्री उशीरा उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले होते.
25 डिसेंबरची रात्री सलमान खानसाठी वेदनादायी ठरली. काल रात्री सलमान खानला साप चावला. पनवेल येथील फार्म हाऊसवर (panvel farm house) सापानं अभिनेता सलमानला चावलं. त्यानंतर तात्काळ सलमान खानला हॉस्पीटलमध्ये अॅडमीट करण्यात आलं. उपचारासाठी सलमान खानला नवी मुंबई येथील एम.जी.एम. हॉस्पीटलमध्ये (M.G.M. Hospital) दाखल करण्यात आलं होतं.
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सलमान खान (Salman Khan) पनवेल फार्मवर मित्राचा वाढदिवसा साजरा करत होता. गप्पा मारत असताना सलमानच्या हाताला काहीतरी टोचल्यासारखं झालं. त्यानंतर सलमाननं परिसरावरून नजर फिरवल्यास त्यास साप दिसला. मदतीसाठी त्यानं लागलीच आवाज दिला. पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास सलमान रूग्णालयात दाखल पोहचला. सुमारे 6 ते 7 तास रूग्णालयात राहिल्यानंतर सलमान खानला डिस्चार्ज देण्यात आला.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
मीडिया रिपोर्टनुसार, सलमान खानचं फार्म हाऊस मोठं आहे. परिसरात घनदाट जंगल आहे. यापुर्वी देखील सलमानला फार्म हाऊसजवळ साप दिसले होते. त्यानंतर फार्म हाऊसची देखभाल करणार्यांना त्याने सावध देखील केले होते. सलमान खानला पहिल्यांदाच फार्म हाऊसवर साप चावला आहे. दरम्यान, चावलेला साप हा विषारी नसल्याचं सांगण्यात येत आहे. सलमान खानची प्रकृती आता तंदुरूस्त आहे.
Web Title :- Salman Khan | bollywood actor salman khan bitten by a snake at panvel farm house
Nitin Raut | नितीन राऊत यांना काँग्रेस हायकमांडचा दणका, ‘या’ विभागाच्या अध्यक्षपदावरुन हटवलं!