Sahakar Nagar Pune Crime News | पुणे : अनैसर्गिक कृत्य करायला लावून धमकाविल्याने दहावीतील मुलाची आत्महत्या

November 26, 2024

पुणे : Sahakar Nagar Pune Crime News | अनैसर्गिक कृत्य (Unnatural Act) करायला लावून त्याचे फोटो काढून विविध मोबाईलवरुन फोन करुन मानसिक त्रास दिल्याने एका १५ वर्षाच्या मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

याबाबत मुलाच्या वडिलांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात (Sahakar Nagar Police Station) फिर्याद दिली आहे. त्यावरुन संकेत राजेश मोहिले Sanket Rajesh Mohile (वय २६, रा. भवानी पेठ तसेच मोहननगर, धनकवडी – Mohan Nagar Dhankawadi) याच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार तळजाई येथील टेकडीचे परिसरात नोव्हेबर २०२३ ते २५ नोव्हेबर २०२४ दरम्यान घडला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या १५ वर्षाच्या मुलगा दहावीमध्ये शिकत होता. आरोपी संकेत मोहिले हा त्याला तळजाई येथील टेकडीवर घेऊन गेला. तेथे त्याने आपले कपडे काढून मुलावर अनैसर्गिक अत्याचार केला. त्याचे त्याने फोटो काढले. त्यानंतर त्यास विविध मोबाईल नंबरवरुन सतत फोन करुन त्रास देत होता. त्यातून त्यांचे मानसिक खच्चीकरण केले. त्यामुळे या मुलाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. सहायक पोलीस निरीक्षक विशाल पवार (API Vishal Pawar) तपास करीत आहेत.