मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – आपल्या बेधडक वक्तव्यांमुळे भाजपच्या खासदार साध्वी प्रज्ञा सिंह अनेकदा चर्चेत असतात, पण ‘त्या आमच्या पक्षात असणं हे आमच दुर्दैव आहे’ असे वक्तव्य त्यांच्यावीषयी भाजपच्याच प्रवक्त्यांनी केले आहे. त्याचे झाले असे की एका टीव्ही चॅनलवर चर्चेच्या कार्यक्रमामध्ये साध्वी प्रज्ञा सिंह यांचे नाव निघाले त्यावेळी भाजपचे प्रवक्ते मधू चव्हाण म्हणाले की, ‘त्या साध्वी मूर्ख आहेत. दुर्दैव आहे आमचं त्या आमच्या पक्षात आहेत’ आता आपल्याच पक्षातील व्यक्तीने अशा प्रकारचे वक्तव्य केल्यामुळे राजकीय वर्तुळात याची चर्चा रंगली आहे.
‘गांधींचा मारेकरी हिंदूच’, असं उर्मिला मातोंडकर पुण्याच्या CAA विरोधातल्या सभेदरम्यान म्हणाल्या होत्या. याविषयी चर्चा सुरू असताना भाजप खासदार साध्वी प्रज्ञासिंह यांचा उल्लेख आल्यावर चव्हाण यांनी त्या आमच्या पक्षात आहेत, हेच दुर्दैव असल्याचं म्हटलं.
‘ब्रिटीशकालीन भारतात रॉलेट कायदा हा काळा कायदा म्हणून ओळखला जायचा. CAA सुद्धा काळा कायदा आहे’, असं उर्मिला मातोंडकर पुण्याच्या सभेत म्हणाल्या होत्या. या सगळ्यावर एक वृत्तवाहिनीवर वर चर्चा सुरू असताना भाजपच्या खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर मधू चव्हाण यांनी भाजपच्या खासदार साध्वी प्रज्ञासिंह यांच्याविषयी असे उद्गार काढले.
कोणत्याही गुन्हेगारांची जात, धर्म काढणं अयोग्य
“गुन्हेगार हा गुन्हेगार असतो. कोणत्याही गुन्हेगारांची जात, धर्म काढणं अयोग्य आहे. गोडसे खुनी होता. त्याने गांधीजींचा खून केला, हेच खरं आहे. तो हिंदू होता की, मुस्लीम याचा विचार करणं गैर आहे. CAA विरोधात खोटा प्रचार सुरू आहे. तो मुस्लीमविरोधी कायदा असल्याचं सांगितलं जात आहे पण ते खरं नाही”, असं चव्हाण म्हणाले.
उर्मिला मातोंडकर यांनी हा कायदा गरिबांच्या विरोधात आहे, असं म्हणाल्या. त्यावर उत्तर देताना महाराष्ट्राचे भाजप प्रवक्ते मधू चव्हाण म्हणाले, “निर्वासितांना नागरिकत्व देण्याचा कायदा आहे. कुणाचं नागरिकत्व काढून घेण्याचा हा कायदा नाही. अपप्रचार का करतात? मुस्लीम शब्द या कायद्यात नाही.”
नथुराम हिंदू होता, पण तो खुनी होता. गुन्हेगाराला जात -धर्म नसतो. ती प्रवृत्ती असते. नथुराम हिंदू आहे असं म्हणायचं कारण काय? उर्मिला यांना त्यांच्या पतीने सांगितलं का असं म्हणायला? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.