मुंबई :बहुजननामा ऑनलाइन – Sachin Vaze |प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानी आढळून आलेली स्फोटकांनी भरलेली गाडी आणि मनसुख हिरेन (Mansukh Hiren) हत्या या प्रकरणामध्ये सध्या पोलीस दलातून बरखास्त केलेले सचिन वाझे (Sachin Vaze)हे मुंबईच्या तळोजा जेलमध्ये आहेत. मागील काही दिवसापासून ते सीबीआय चौकशीत होते. आता मात्र सचिन वाझे (Sachin Vaze) यांची चौकशी सक्तवसुली संचालनालय (ईडी) करणार आहे. (गुरुवारी) 8 जून रोजी तळोजा तुरुंगात चौकशी करण्याची परवानगी विशेष पीएमएलए (PMLA Court) कोर्टाने ED ला दिली आहे. यानुसार ED आता वाझेची चौकशी तळोजा तुरुंगात जाऊन करणार आहे.
Sachin Vaze | money laundering case ed record sachin waze statement permission granted by court
काही दिवसापूर्वी सक्तवसुली संचालनालयाने (ED) राज्याचे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या घरावर छापा टाकला. त्यानंतर तपासणीनंतर दोन्ही सचिव संजीव पलांडे (Sanjeev Palande) आणि कुंदन शिंदे (Kundan Shinde) यांना त्यावेळी अटक करण्यात आले. अटकेनंतर त्यांची चौकशी करण्यात आली. सचिन वाझेनी मुंबईतील हॉटेल बार मालकांकडून तब्बल 4 कोटी 70 लाख रुपये वसूल करून 2 हप्त्यांमध्ये शिंदे यांच्याकडे दिले होते, याबाबत कबुली देशमुख यांचे सचिव कुंदन शिंदे आणि संजीव पलांडे यांनी दिल्याचा दावा ED कडून करण्यात आला आहे.
या दरम्यान, अनिल देशमुखांच्या (Anil Deshmukh) सचिवांना 70 लाख रुपये दिले होते, असा धक्कादायक खुलासा सचिन वाझेने जबाबात नोंदवला आहे. अनिल देशमुख थेट आदेश द्यायचे असे देखील सचिन वाझेनं आपल्या जबाबात म्हटलं होतं. तर याच जबाबानुसार सचिन वाझेची चौकशी करायची असल्याने वाझे तळोजा तुरुंगात आहेत. आणि तुरुंगात जाऊन चौकशी करण्याची परवानगी ED ला मिळावी आहे. याबाबत विनंती अर्ज सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) केला होता. ED चा अर्ज कोर्टानं (PMLA Court) ग्राह्य धरला आहे.
Web Title : Sachin Vaze | money laundering case ed record sachin waze statement permission granted by court.
Kalyan Singh | उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांची प्रकृती चिंताजनक
Khadakwasla Dam | खडकवासल्यातील जूनमधील यंदाचा पाऊस अकराव्या स्थानी
Monsoon Update । राज्यात सर्वत्र पावसाची रिपरिप सुरु, चिंतेत असणाऱ्या बळीराजाला दिलासा