ईडिने (ED) अनिल देशमुख यांचे खासगी सहाय्यक कुंदन शिंदे (Kundan Shinde) आणि संजीव पलांडे (Sanjeev Palande) यांनाही अटक (Arrest) केली होती. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त (Mumbai Former CP) परमबीर सिंह (Parambir Singh) यांनीही आपल्या पत्रात या दोघांच्या माध्यमातून खंडणी गोळा केली जात असल्याचा आरोप केला होता. परंतु काही दिवासंपूर्वीच परमबीर सिंह यांनी आपल्याकडे तसे कोणतेही पुरावे नसल्याचे म्हटले. त्यानंतर आता सचिन वाझे (Sachin Vaze) यानेही आपण अनिल देशमुख यांना कोणतेही पैसे दिले नसल्याची कबुली दिल्याने या प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
परमबीर सिंह आणि सचिन वाझे यांच्या आरोपांमुळे अनिल देशमुख यांना गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. याप्रकरणामुळे महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi) मोठी नाचक्की झाली होती. काही दिवसांपूर्वी अनिल देशमुख ईडीसमोर हजर झाले होते. त्यानंतर चौकशी करुन ईडीने अनिल देशमुख यांना अटक केली होती.
Web Title :- Sachin Vaze | ex police officer of mumbai police sachin vaze and anil deshmukh probe infront of chandiwal commission i didnt give any money to anil deshmukh says sachin vaze
Mumbai High Court | कोविडचा ‘सामना’ करण्याबाबत हायकोर्टाने केले ‘ठाकरे सरकार’चे कौतूक