मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – मुकेश अंबानी यांच्या घरासमोर आढळलेली स्फोटके आणि मुबईचे व्यापारी मनसुख हिरेन हत्या प्रकरणातील आरोपी निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या रक्तपुरवठा करणाऱ्या वाहिन्यांमध्ये ९० टक्क्यांचे दोन ब्लॉकेजेस अर्थात हृदयविकाराचा त्रास असल्याचा दावा सचिन वाझे यांच्या वकिलांनी राष्ट्रीय तपास संस्था (NIA) कोर्टात अर्ज दाखल करून वैद्यकीय उपचाराची मागणी केलीय.
या प्रकरणावरून निलंबित API सचिन वाझे NIA ला ताब्यात घेतलं होतं. तर वाझे हे मागील २२ दिवसांपासून NIA च्या कोठडीत आहे. ज्यावेळी वाझेंना ताब्यात घेतल्यानंतर त्याने छातीत दुखत असल्याची तक्रार केली होती. यावरून त्याची जे. जे. हॉस्पिटलमध्ये तपासणी करण्यात आली. यानंतरच्या तपासावेळी सुद्धा सचिन वाझेने २ ते ३ वेळा प्रकृतीसंबधी तक्रार केली होती. त्यावेळी वाझे यांच्या चाचण्या केल्या गेल्या तेव्हा त्याला मधुमेहाचा त्रास असल्याचंही पुढं आलं होतं.
सध्या, सचिन वाझे यांना हृदयविकाराचा त्रास असल्याची माहिती त्याच्या वकिलांनी अर्जाद्वारे कोर्टाला दिली आहे. या अर्जावरून आता कोर्टाने सचिन वाझेचा वैद्यकीय अहवाल मागवला आहे. या दरम्यान, सचिन वाझेच्या कोठडीतील मुदत आज संपत आहे. अधिक चौकशी करण्यासाठी सचिन वाझेंच्या कोठडीत वाढ व्हावी असे NIA चे म्हणने आहे. त्यासंदर्भातच्या सुनावणीसाठी आज वाझेला कोर्टासमोर हजर करण्यात येणार आहे. यावेळी सचिन वाझेचा वैद्यकीय अहवाल सादर केला जाण्याची शक्यता असून आता कोर्ट काय निर्णय घेते हे बघणं महत्वपूर्ण असणार आहे.
दरम्यान, उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानी गाडीत स्फोटके ठेवण्यापूर्वी निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेसह जी महिला दिसली होती, तिची NIA ने १३ तास चौकशी केली. या महिलेच्या माध्यमातून सचिन वाझे हे राजकीय नेत्यांच्या संपर्कात होते, यावरून आता राष्ट्रीय तपास संस्थेचा (NIA) संशय व्यक्त केला आहे.