पुणे : बहुजननामा ऑनलाइन – मागील दोन दिवसांपासून पुण्यात (Rain in Pune) मुसळधार पाऊस पडत आहे. मुसळधार पावसामुळे (Heavy Rain) अनेक सखल भागांमध्ये पाणी साचल्याने याचा परिणाम वाहतुकीवर (Traffic) होत आहे. पुण्यातील रस्त्यावर साचलेल्या पाण्यावरुन काँग्रेस (Congress) नेते सचिन सावंत (Sachin Sawant) भाजपच्या कारभारावर खोचक टीका केली आहे. सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी भाजप कार्यालयासमोरील रस्त्यावर साचलेल्या पाण्याचा व्हिडिओ ट्विट करत पुणे भाजप (Pune BJP) आणि महपालिकेच्या (Pune Municipal Corporation (PMC) भोंगळ कारभारावर टीका केली आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले की, ‘येरे येरे पावसा, पुणे पालिकेचा खाल्ला पैसा, पैसा मिळाला मोठा, #भाजपा ठरला खोटा, ये गं ये गं सरी, #भाजपा खिसे भरी, सर आली धावून, भाजप ऑफिस गेले वाहून!’ अशा शब्दात सावंत यांनी भाजपवर खोचक शब्दात टीका केली आहे. सावंत यांच्या टीकेला भाजप कशा पद्धतीने प्रत्युत्तर देते हे पहावे लागणार आहे.
https://twitter.com/sachin_inc/status/1569591475255791617?s=20&t=QL0VPWZeF6Mho7oTX0q5qQ
दरम्यान, मागील दोन दिवस पडत असलेल्या पावसामुळे पुण्यातील रस्ते जलमय होत आहेत,
मात्र यामध्ये पुणे महापालिकेचा भोंगळ कारभार समोर येत आहे. पुण्यातल्या मुख्य रस्त्यांवर पाणी साचत आहे.
सर्व ड्रेनेज लाईन तुंबलेल्या आहेत. जंगली महाराज रोड (JM Road), मॉडर्न कॉलनी (Modern Colony),
आपटे रस्ता (Apte Road) या रोडवर मोठ्या पाणी साचत असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
हवामान विभागाने (Meteorological Department) आज (मंगळवार) कोल्हापूर, पालघर, ठाणे, मुंबई, रायगड,
रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे (घाट), सातारा (घाट), औरंगाबादसाठी येलो अलर्ट (Yellow Alert) जारी केला आहे.
पुण्यात होणाऱ्या पावसाने रस्त्यावर पाणी साचत असून काही ठिकाणी वाहतुकीला अडथळे निर्माण होत आहेत.
Web Title :- Sachin Sawant | Congress Leader Sachin Sawant Pune Municipal Corporation PMC BJP Office Rain Roads In Pune
हे देखील वाचा :
PM Kisan चा 12वा हप्ता मिळण्यापूर्वी शेतकर्यांना खुशखबर ! मोदी सरकारने दिला ‘हा’ मोठा दिलासा