पुणे : बहुजननामा ऑनलाईन – युवक क्रांती दलाच्या पुणे शहराध्यक्ष पदी सचिन पांडुळे यांची निवड करण्यात आली आहे. डॉ. प्रविण सप्तर्षी यांच्या अध्यक्षतेखाली आज 13 जुलै 2019 रोजी झालेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली.
युवक क्रांती दलाचे कार्यवाह संदीप बर्वे, जांबुवंत मनोहर, अप्पा अनारसे, रवी लाटे उपस्थित होते.
युवक क्रांती दलाच्या पुणे शहराच्या नवनिर्वाचित कार्यकारिणी यावेळी ठरविण्यात आली. त्यात सचिन पांडुळे (अध्यक्ष पुणे शहर),सुदर्शन चखाले (सेक्रेटरी पुणे शहर),ऋतुजा पुकाळे ( संघटक ,पुणे शहर),प्रसन्न मराठे ( उपाध्यक्ष ,पुणे शहर),कमलाकर शेटे (उपाध्यक्ष, पुणे शहर)यांची निवड करण्यात आली आहे.