पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Sachin Ahir | पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे (Environment Minister Aditya Thackeray) यांनी आज पुणे आणि पिंपरी चिंचवडचा दौरा केला. यावेळी ठाकरे यांनी प्रशासकीय बैठकीसह शिवसेना पक्षाच्या (Shiv Sena) नेत्यांशी देखील चर्चा केली आहे. जिल्ह्यातील आजी माजी आमदार, खासदार, जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक यांची बैठक घेत पक्षीय संघटना मजबूत करण्यावर त्यांनी चर्चा केल्याची माहिती संपर्कप्रमुख सचिन अहिर (Sachin Ahir) यांनी दिली आहे.
महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडी करण्याची आमची इच्छा आहे, मात्र तसे न झाल्यास आम्ही स्वबळावर लढण्याची तयारी केली आहे. असं अहिर यावेळी म्हणाले. पक्ष कार्यकर्त्यांसाठी व्यासपीठ तयार करण्याचं काम आम्ही करत आहोत. शिवसेना मंत्र्यांच्या माध्यमातून जिल्ह्याचे प्रश्न सोडवण्यावर आम्ही भर देत असल्याचेही ते यावेळी म्हणाले.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
दोन्ही महापालिकेतील (Pune Corporation) परिस्थिती पाहिली तर सत्ताधारी भाजपचे नगरसेवक एकमेकांवर भष्ट्राचाराचे आरोप करत आहेत. त्यामुळे पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये (Pimpri Corporation) शिवसेना हा जनतेसाठी उत्तम पर्याय असल्याची भावना जनतेमध्ये आहे, असं सचिन अहिर (Sachin Ahir) म्हणाले.
दरम्यान मनसे भाजप युतीच्या (MNS-BJP) चर्चेवर त्यांना विचारलं असता, मनसेची आजवरची भूमीका कोणाला पोषक आहे हे पाहिल्यास सर्वकाही दिसून येत, अशी टीका त्यांनी केली आहे.
Web Title : Sachin Ahir | Willingness to form a grand alliance, but if not, ready to fight on one’s own – Sachin Ahir
Pune News | सीसीटीव्ही खरेदीच्या चौकशीसाठी 4 सदस्यांची समिती
Manohar Mama Bhosale | अबब ! मनोहरमामा भोसले यांच्या बँक अकाऊंटमध्ये ‘इतके’ लाख रुपये कुठून आले?
Pune Crime | पुण्यात ‘ते’ होर्डिंग लावणाऱ्याविरुद्ध अखेर गुन्हा दाखल
Solapur Crime | धक्कादायक ! पतीच्या निधनानंतर पत्नीचीही रेल्वेखाली आत्महत्या; प्रचंड खळबळ
Pune News | खुशखबर ! मुंबईच्या धर्तीवर पुणे, पिंपरीतील झोपडपट्टीधारकांना मिळणार 300 चौरस फुटांची घरे
Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या किंमतीत आणखी घसरण; जाणून घ्या आजचे दर