मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – शिवसेनेचे अंधेरी पूर्व विधानसभेचे आमदार रमेश लटके (MLA Ramesh Latake) यांचे निधन झाले आहे. त्यामुळे या ठिकाणी पोटनिवडणुक (Andheri East by-Election) घेण्यात येणार आहेत. त्यासाठी शिवसेनेकडून त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके (Rutuja Latake) यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. परंतु आता ऋतुजा लटके (Rutuja Latake) यांचा महापालिकेतील नोकरीचा राजीनामा (Resignation) मंजूर न करण्यासाठी महापालिका आयुक्तांवर (Municipal Commissioner) दबाव टाकण्यात येत असल्याचा आरोप शिवसेनेच्या ठाकरे गटाने (Shivsena Thackeray Group) केला आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
त्यामुळे आगामी काळात जर का ऋतुजा लटके (Rutuja Latake) यांचा राजीनामा स्वीकारला गेला नाही, तर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. दरम्यान, ऋतुजा लटके यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची भेट घेतली होती, अशा बातम्या समोर आल्या होत्या. शिवसेनेने हा दावा फेटाळला आहे. ऋतुजा लटके यांना शिंदे गटात खेचण्याचे प्रयत्न सुरु आहेत. आणि आगामी काळात जर का त्या शिंदे यांच्या गटात गेल्या किंवा त्यांच्या राजीनाम्याची कार्यवाही रखडली, तर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी दुसऱ्या मार्गाचा देखील विचार करुन ठेवल्याची माहिती आहे.
त्यांच्या राजीनाम्याला राजकीय दबावाने थांबविले असल्याचा आरोप उद्धव ठाकरे शिवसेनेच्या अॅड. अनिल परब (Anil Parab) आणि खासदार अरविंद सावंत (Arvind Sawant) यांनी केला आहे.
परंतु काही कारणाने लटके यांना उमेदवारी देता आली नाही किंवा त्यांनी शिंदे गटात मोर्चा वळविला,
तर त्यांच्या जागी दुसरा कोणता उमेदवार देता येईल? याची चाचपणी शिवसेनेच्या ठाकरे गटाने सुरु केली आहे.
Web Title :- Rutuja Latake | kishori pednekar targets shinde fadnavis government over rutuja latke andheri east bypoll
हे देखील वाचा :
Swatantra Veer Savarkar | ‘सावरकर हे भाजपच्या दृष्टीने तोंडी लावायला आणि चघळायचा विषय झाला आहे’