नागपूर : बहुजननामा ऑनलाईन – सासू सोबत झालेल्या घरगुती वादातून एका निर्दयी महिलेने तिच्या 6 महिन्याच्या चिमूकल्याला अमानुष मारहाण केली होती. काही दिवसापूर्वी घडलेल्या या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली होती. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या होत्या. अखेर नागपूर mns women मनसेच्या महिला mns women पदाधिका-यांनी या महिलेला चांगलाच धडा शिकवला आहे.
*आईचा लहान बाळावर अत्याचार मनसे महिलांनी घेतला समाचार….*
सासू सोबत सुरू असलेल्या वादातून एका महिलेने तिच्या चिमूकल्याला अमानुष मारहाण केली.हा व्हिडिओ शोशियल मीडिया वर व्हायरल झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली होती.#RajThackeray #AmitThackeray #BalaNandgaonkar #RajuPat#मराठी pic.twitter.com/DXIQBoCRwU
— Manisha papdkar (@PapadkarManisha) June 5, 2021
मनसेच्या महिला शहराध्यक्षा मनिषा पापडकर, सचिव स्वाती जैस्वाल, अचला मेसन यांनी या महिलेचा शोध घेऊन तिच्या घरी धडक दिली.
महिलांनी सुरुवातीला त्या निर्दयी आईला बदडल अन् नंतर तिची समस्या जाणून तिला मदतीचा हातही दिला.
मनसेन केलेल्या या कृत्याचे कौतुक होत आहे.
काय आहे प्रकरण
दरम्यान सासुसोबत झालेल्या वादातून एका महिला तिच्या चिमुकल्याला अमानुष मारहाण करत होती.
या निरागस जिवाचा आकांत सुरू असताना ती निर्दयी महिला चिमुकल्याला वांरवार गादीवर आपट होती.
त्याला गालावर, तोंडावर,पाठीवर सारखी मारत होती.
हा व्हिडीओ 24 मे रोजी सोशल मीडियावर Social media व्हायरल Viral झाला अन् एकच खळबळ उडाली.
घटनेची माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत पीडित महिलेला आणि तिच्या बाळाला ताब्यात घेतले.
त्यानंतर डॉक्टराकडून बाळाची तपासणी करून घेतली. रात्र झाल्यामूळे बाळाच्या सुरक्षिततेची हमी घेऊन महिलेला सोडून दिले होते.