नवी दिल्ली : वृत्तसंस्था – रशियामध्ये अब्जाधीश बिझनेस मॅनच्या मुलीचा अत्यंत उंच इमारतीच्या खिडकीतून खाली पडून मृत्यू झाला आहे. यानंतर, रशियन माध्यमांमध्ये मृत्यूसंदर्भात कट रचल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. तथापि, 19 वर्षीय वलेरिया शापीलेन्कोच्या वडिलांनी मृत्यूसंदर्भात कट रचल्याचे नाकारले आहे आणि लोकांनी या अफवांकडे दुर्लक्ष करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
‘टेक्नो पार्कों’ नेटवर्कचे मालक आणि मृत महिलेच्या वडिलांनी सांगितले की, मुलगी दुर्दैवाने तिच्या बेडरूमच्या खिडकीतून खाली उंच इमारतीत खाली पडली ज्यामध्ये तिचा मृत्यू झाला. यात ‘अपराधिक’ असे काही नाही.
टॉवर ब्लॉकमधील घराच्या खाली 19 वर्षीय वलेरिया शापीलेन्को हीचा मृतदेह सापडला. या मुलीच्या मृत्यूच्या तपासणीसाठी तपास यंत्रणांचा गुंतली आहे. आपल्या मुलीच्या 19व्या वाढदिवसाच्या दुसर्या दिवशी रात्री 1 वाजेच्या सुमारास रशियन माध्यमात वलेरियाच्या मृत्यूच्या कोणत्याही कट रचण्याची शक्यता वडिलांनी पूर्णपणे नाकारली आहे.
वृत्तानुसार, वडिलांनी सांगितले की, जेव्हा त्यांनी मुलीच्या ओरडण्याचा आवाज ऐकला आणि जेव्हा ते बेडरूममध्ये पळत गेले तेव्हा खिडकी उघडली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टॉवरखाली तिचा मृतदेह सापडला. ते म्हणाले की, “चुकीची माहिती पसरू नये. हा माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी खूप कठीण काळ आहे. मला हा संदेश लोकांना देणे भाग पडले आहे.”
ते म्हणाले की, ‘मी पाहत आहे की, काही माध्यम संस्था माहितीचा चुकीचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करीत आहेत, हे काहीतरी विकृत आणि गुन्हेगारी घटना म्हणून सादर करण्याचा प्रयत्न करीत आहेत. पोलिस सूत्रांनी सांगितले की, प्राथमिक तपासात ‘संघर्षाचे कोणतेही निशाण सापडले नाही’, परंतु तपास सुरू आहे. कोणतीही सुसाइड नोट सापडली नाही आणि मित्रांनी सांगितले की, तिच्या आत्महत्येची कोणतीही चिन्हे नाहीत. मृत मुलीच्या वडिलांनी सांगितले की, “ती एक आदर्श आणि जगातील दयाळू, सहानुभूतीशील व्यक्तिमत्त्वाची मुलगी होती”, वडिलांनी माध्यमांना सांगितले की, मुलीच्या मृत्यूचा अंदाज लावून तिला बदनाम करू नका.