नवी दिल्ली : वृत्त संस्था – काश्मीरबाबत भारताच्या दृष्टिकोनाविषयी अजिबात शंका नाही, असे रशियाने म्हटले आहे. ज्यांना शंका असेल ते काश्मीरचा दौरा करू शकतात. हे भारत आणि पाकिस्तानाचे द्विपक्षीय प्रकरण आहे. रशियाने म्हटले की आम्ही लवकरच भारताला एस-400 एयर डिफेंस मिसाईल सिस्टमची डिलिव्हरही करू शकतो. एका अहवालानुसार 2025 पर्यंत सर्व एस -400 एयर डिफेंस मिसाईल सिस्टम भारतात पोहचतील. एस -400 मिसाईलचे उत्पादन सुरू झाले आहे.
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर 22 मार्च आणि 23 मार्चला रशिया-भारत-चीन त्रिपक्षीय बैठकीत सहभागी होण्यासाठी रशियाला जाणार आहेत. एस -400, एस -300ची सुधारित आवृत्ती आहे. जे आतापर्यंत केवळ रशियन लष्कराकडे उपलब्ध होते. भारतातील रशियाचे राजदूत निकोलाई कुदाशेव यांनी शुक्रवारी म्हटले की, जे परदेशी दूत काश्मीरमधील भारताच्या नितीवर शंका घेतात, त्यांनी आठवड्याच्या सुरूवातीस केंद्र शासित प्रदेशात दौरा केला होता. जे लोक काश्मीरमधील स्थितिबात चिंतेत आहेत, जे लोक काश्मीरमधील भारताच्या नितीवर शंका घेत आहेत, ते या भागाचा दौरा करू शकतात. आम्हाला कधीही शंका नव्हती.
संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत काश्मीरप्रकरणावर आवाज उठवणाच्या चीनच्या प्रयत्नांबाबत विचारले असता कुदाशेव यांनी सांगितले की, हे प्रकरण भारत आणि पाकिस्तानमधील द्विपक्षीय आहे. रशियन मिशनचे उप प्रमुख रोमन बाबूसकिन यांनी म्हटले की, एस -400 मिसाईचे उत्पादन सुरू झाले आहे. सर्व एस -400 वायु सुरक्षा मिसाईल प्रणाली 2025 पर्यंत भारतात पोहोचतील.
ऑक्टोबर 2018 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियन राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांनी मास्को ते नवी दिल्लीपर्यंत एस -400 ट्रायम्फ मिसाईल प्रणाली देण्याच्या करारावर स्वाक्षरी केली होती. करारावर स्वाक्षरी केल्यानंतर अमेरिकेने इशारा दिला होता की जर हा करार झाला तर अमेरिका भारतावर प्रतिबंध लागू करेल. नव्या अमेरिकन कायद्यानुसार, जो देश रशियन सुरक्षा अथवा गुप्त क्षेत्रांशी संबंधित आहे, त्यांना अशा प्रतिबंधाचा सामना करावा लागू शकतो.
Visit : Bahujannama facebook page –
- ‘अॅपल टी’चे हे 4 फायेद वाचून व्हाल थक्क! जाणून घ्या ‘रेसिपी’
- संधिवाताची ‘ही’ आहेत 10 लक्षणे आणि 11 कारणे, जाणून घ्या महत्वाच्या गोष्टी
- रंग आणि आरोग्याचे ‘कनेक्शन’ ! जाणून घ्या ‘या’ 10 रंगांचे तुमच्यावरील परिणाम
- ‘या’ 6 पद्धतीने करा तुमच्या आयुष्यातून तणावाला हद्दपार
- ‘विराट’ आणि ‘सेरेना’नेही केला होता फॉलो, ‘वेगन डाएट’चे हे 6 फायदे जाणून घ्या
- झोपल्यावर घाम येत असल्यास ‘या’ 9 कारणांचा विचार करा