पनवेल : वृत्त संस्था – anti corruption bureau | नवी मुंबई(navi mumbai)च्या परिसरात असलेल्या गावांमधील घराच्या किंमती मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. त्यातून या ग्रामपंचायतीही मोठ्या प्रमाणावर कर गोळा करुन श्रीमंत झाल्या आहेत. त्याचबरोबर येथील अधिकारीही गब्बर झाले आहेत. त्यातूनच या अधिकार्यांनी केवळ घरपट्टी आणि असेसमेंट(Real estate and assessment) उतारा देण्यासाठी चक्क १ लाख रुपयांची लाच मागितली. तडजोडीअंती ९५ हजार रुपये घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने ग्रामविकास अधिकारी आणि दिवा बत्ती व पाणी पुरवठा कर्मचार्याला रंगेहाथ पकडले.
anti corruption bureau | rural development officer is in acb net
ग्रामविकास अधिकारी(Village Development Officer) दगडू उत्तम देवरे( वय ५४) आणि दिवाबत्ती व पाणी पुरवठा कर्मचारी(Lighting and water supply staff) प्रकाश दगडू डाकी (वय ३०) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. दोघेही पनवेल तालुक्यातील वडघर ग्रामपंचायतीमध्ये कामाला आहेत. anti corruption bureau | rural development officer is in acb net
याप्रकरणी एका ५२ वर्षाच्या व्यक्तीने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली आहे. तक्रारदार यांच्या घराचे घरपट्टी व असेसमेंट उतारा देण्यासाठी ग्रामविकास अधिकारी दगडू देवरे याने २० एप्रिल २०२१ रोजी एक लाख रुपयांची लाच मागितली होती. तक्रारदाराने अनेकदा विनंती केल्यानंतरही त्यांनी उतारा दिला नाही. लाच दिल्याशिवाय उतारा मिळणार नसल्याचे पाहून तक्रारदारांनी नवी मुंबईतील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली. तेथे त्यांच्या तक्रारीची पडताळणी करण्यात आली.
त्यानुसार देवरे याने तडजोडीअंती ९५ हजार रुपये घेण्याचे मान्य करुन ती रक्कम प्रकाश डाकी याच्याकडे देण्यास सांगितले. त्यानुसार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने पनवेल एस टी स्टँड (Panvel ST Stand) च्या मागे इच्छापूर्ती गणेश मंदिरासमोरील रोडवर सापळा लावला. तक्रारदाराने २ हजार व पाचशे रुपयांच्या २१ हजार रुपयांच्या नोटा व त्याखाली ७४ हजार रुपयांच्या २ हजार रुपयांच्या कलर झेरॉक्स नोटा यांचे बंडल तयार केले. कारमधून आलेल्या प्रकाश डाकी याने ही रक्कम स्वीकारताच त्याला रंगेहाथ पकडण्यात आले.
web title: Rural Development Officer caught red handed for taking bribe of multiple lakh rupees
Pune Crime | पुण्यातील प्रसिद्ध बिल्डर अमित लुंकडला गुन्हे शाखेकडून अटक; आज दुपारी कोर्टात हजर करणार
diesel Petrol price hike | पेट्रोल-डिझेलच्या दरात पुन्हा वाढ; जाणून घ्या आजचे दर
Pune News | मंत्रालयात बॉम्ब ठेवला असल्याचा ई-मेल करणार्यास घेतले पुण्यातून ताब्यात