मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – Rupali Chakankar | मागील काही दिवसांपासून राज्यात कोरोना (Coronavirus) रूग्णांचा आकडा झपाट्याने वाढत असल्याचे दिसत आहे. त्यातच राज्यातील आमदार, मंत्री, नेतेमंडळीनाही कोरोनाचा संसर्ग झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे राजकीय क्षेत्रातही भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यातच आता राष्ट्रवादीच्या नेत्या (NCP) आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनाही कोरोनाची लागण (Corona Positive) झाली आहे.
सौम्य लक्षणे जाणवल्यामुळे कोरोनाची चाचणी केली असता माझा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी लक्षणे जाणवल्यास कोरोना चाचणी करून घ्यावी. लवकरच मी आपल्या सर्वांच्या सेवेत पुन्हा रुजू होईन.
— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) January 5, 2022
‘सौम्य लक्षणे जाणवल्यामुळे कोरोनाची चाचणी केली असता माझा रिपोर्ट पॉझिटिव्ह (Corona Positive) आला आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी लक्षणे जाणवल्यास कोरोना चाचणी करून घ्यावी. लवकरच मी आपल्या सर्वांच्या सेवेत पुन्हा रुजू होईन,’ अशी माहिती रूपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी ट्विटच्या माध्यमातून दिली आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
दरम्यान, रुपाली चाकणकर यांना कोरोना झाल्याने नेतेमंडळींच्या कोरोना रुग्णसंख्येत आणखी वाढ झाली आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे, प्रताप सरनाईक, बाळासाहेब थोरात, यशोमती ठाकूर, वर्षा गायकवाड, केसी पाडवी यांच्यासह राधाकृष्ण विखे पाटील, हर्षवर्धन जाधव, पंकजा मुंडे, सुजय विखे पाटील, सुप्रिया सुळे, अरविंद सावंत, वरुण देसाई, प्रवीण दरेकर यांनाही कोरोनाची बाधा झाली आहे.
Web Title :- Rupali Chakankar | State Women’s Commission chairperson Rupali Chakankar become covid-19 positive