बहुजननामा ऑनलाईन – देशातला सर्वात मोठा टीव्ही रिअॅलिटी शो बिग बॉस 14 (Bigg Boss Hindi season 14) जिंकल्यानंतर अॅक्ट्रेस रुबीना दिलैक (Rubina Dilaik) कडे आता खूप सारी कामं आली आहे. तिचं करिअर पुन्हा गती घेताना दिसत आहे. प्रत्येक निर्माता तिला अप्रोच करताना दिसत आहे. अशात आता अशी माहिती समोर आली आहे की, रुबीना टीव्हीची नवीन नागिन बनू शकते. असं म्हटलं जात आहे की, फिल्म आणि टीव्हीची प्रोड्युसर एकता कपूर (Ekta Kapoor) नागिन 6 साठी रूबीना दिलैक ला कास्ट करू इच्छित आहे.
View this post on Instagram
तुम्हाला माहिती नसेल पंरतु दीर्घकाळापासून खुद्द रुबीनाच एकता कपूरच्या एखाद्या सीरियल मध्ये काम करू इच्छित आहे. बिग बॉसमध्ये असताना तिनं याबाबत सांगितलं होतं.
View this post on Instagram
अद्याप तरी नागिन 6 बद्दल औपचारिक घोषणा झालेली नाही. परंतु असं म्हटलं जात आहे की, तयारी सुरू झाली आहे. एकतानं देखील तिच्या मनाची तयारी केली आहे आणि रुबीना देखील नागिन बनण्यासाठी तयार आहे.
View this post on Instagram
रुबीनाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर तिनं शक्ति अस्तित्व के एहसास की या मालिकेत काम केलं आहे. यामध्ये ती किन्नरच्या भूमिकेत होती. चाहत्यांची तिच्या कामाली मोठी पसंती मिळताना दिसली होती. नुकतीच ती बिग बॉस 14 ची विनर झाली आहे.
View this post on Instagram