मुंबई : बहुजननामा ऑनलाईन- उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेत्याच्या हत्येमुळे खळबळ उडाली आहे. एका बापाने-मुलाने मिळून आरएसएस कार्यकर्त्याची हत्या केली आणि आपला गुन्हा कबूल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सायंकाळी आरोपीने करवाडा गावात आरएसएस कार्यकर्त्याची हत्या केली कारण तो आपल्या मुलीला बराच काळ त्रास देत होता.
पंकज असे मृत पावलेल्या व्यक्तीचे नाव असून पंकजने त्याच ठिकाणाहून आपले ग्रॅज्युएशन पूर्ण केले आहे. वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार पंकज हा अनेकदा त्यांच्या मुलीला त्रास देत होता आणि अनेकदा सांगूनही त्याने ऐकले नव्हते. पंकज हा परिसरात आरएसएसचे कार्य करत होता.
आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली
मुजफ्फरनगरच्या एस.एस.पी अभिषेक यादव यांनी सांगितले की, वडील आणि मुलाने आपला गुन्हा कबुल केला आहे आणि मृत व्यक्तीची डेडबॉडी जंगलात सापडली आहे.पंकज त्या दिवशी आपल्या सोनू नावाच्या मित्रासोबत चालला होता अचानक त्याला एक फोन आला आणि त्याने मित्राला पुढे जाण्यास सांगितले.
पंकज रात्री उशिरापर्यंत घरी न आल्याने त्याच्या घरच्यांनी पोलिसांत तक्रार केली त्यानंतर तपास करताना सोनुने पंकजाला ज्या जागेवर सोडले होते त्या ठिकाणी पोलिसांनी तपासणी केली असता रक्ताचे काही डाग त्यांना आढळून आले त्यानंतर जवळच्याच जंगलात पंकजची डेड बॉडीसुद्धा सापडली. मिळालेल्या माहितीनुसार, त्याचा मृतदेह खड्ड्यात सापडला.