लखनऊ : बहुजननामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुक अंतिम टप्प्यात असून दोन टप्प्यातील मतदान बाकी आहे. मात्र, त्यापूर्वीच २३ मेच्या निकालाची चर्चा देशात जोर धरत आहे. देशाच्या राजकारणात उत्तरप्रदेशची महत्वाची भूमिका असते त्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री आणि बसपा अध्यक्ष मायावतींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार निशाणा साधला आहे . मोदी राजकीय स्वार्थासाठीओबीसी कार्ड वापरतात तसेच ते जन्मानं ओबीसी असते तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं त्यांना पंतप्रधान केलं असता का ? असा सवाल ट्विटच्या माध्यमातुन मायावतींनी विचारला आहे .
आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून मायावतींनी दोन ट्विट करत पंतप्रधान मोदींना लक्ष्य केलं. महागठबंधन जातीवादी असल्याची टीका मोदींनी केली होती. त्याला मायावतींनी पहिल्या ट्विटमधून प्रत्युत्तर दिलं आहे . मोदींनी महागठबंधनवर केलेला जातीवादाचा आरोप हा हास्यास्पद असून त्यात कोणतेही तथ्य नाही. मोदी जन्मानं ओबीसी नसल्यानं त्यांना जातीवादाचा त्रास सहन करावा लागलेला नाही. त्यामुळेच ते अशी विधानं करतात,’ अशी टीका मायावतींनी केली आहे.
दरम्यान ,पंतप्रधान मोदी राजकीय स्वार्थासाठी स्वत:ला मागासवर्गीय म्हणवतात, असा आरोप मायावतींनी केला. ‘ मोदी जर खरंच जन्मानं मागास असते, तर संघानं त्यांना कधी पंतप्रधान होऊ दिलं असतं का,’ असा सवाल त्यांनी ट्विटच्या उपस्थित केला आहे.
पीएम श्री मोदी ने अब और कुछ नहीं तो गठबंधन पर जातिवादी होने का जो आरोप लगाया है वह हास्यास्पद व अपरिपक्व है। जातिवाद के अभिशाप से पीड़ित लोग जातिवादी कैसे हो सकते हैं? श्री मोदी जन्म से ओबीसी नहीं हैं इसीलिए उन्होंने जातिवाद का दंश नहीं झेला है और ऐसी मिथ्या बातें करते हैं।
— Mayawati (@Mayawati) May 10, 2019