गांधीनगर : वृत्तसंस्था – नुकताच देशात मोटर व्हिकल अॅक्ट 2019 लागू झाला. यानंतर पूर्ण देशात वाहतूक नियम मोडणाऱ्यांना भरमसाठ दंड भरावा लागत आहे. नव्या वाहतूक नियमांचा आणि अनेक पटीने वाढलेल्या दंडाचा वाहन चालकांनी धसकाच घेतला आहे. विना हेल्मेट पासून ते विना परवाना वाहन चालवल्यास मोठ्या दंडाची तरतूद आहे. अशात आता भाजपची सत्ता असलेल्या गुजरात राज्याने मात्र वाहतूक नियम मोडल्यानंतर आकारण्यात येणाऱ्या दंडात कपात केली आहे. यामुळे चालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
https://twitter.com/CMOGuj/
वाहतूक नियम मोडल्यास अनेक पटीने दंड आकारण्याची तरतूद असताना गुजरात राज्याने मात्र या दंडाच्या रकमेत कपात केली आहे. विनाहेल्मेट दुचाकी चालवत असाल तर कायद्यात 1000 रुपेय दंडाची तरतूद आहे. मात्र गुजरात सरकार 500 रुपये दंड आकारणार आहे. काही प्रकरणात ही कपात 1000 रुपयांपासून ते 10000 रुपयांपर्यंत आहे.
https://twitter.com/ANI/
गुजरात सरकारच्या या दंडाच्या कपातीमुळे वाहन चालकांना दिलासा मिळाला असणार एवढे मात्र नक्की. कारण नव्या दंडाच्या रकमेमुळे अनेकांना मोठा भुरदंड पडला आहे. अनेक अशा घटना समोर आल्या आहेत ज्यात चालकाला आकारलेल्या दंडाची रक्कम ही त्याच्या दुचाकीच्या किंमतीहूनही अधिक आहे.
- रोज काही वेळ तर्जनीवर दाब दिल्यास होतील ‘हे’ खास फायदे
- गुलाबाच्या पाकळ्या देतात १० आरोग्य फायदे, अवश्य जाणून घ्या
- ‘एरियल योग’ माहित आहे का ? मसल्स, खांदे आणि स्पाइन होईल मजबूत
- ‘बॅलन्स डायट’ म्हणजे काय? यासाठी जेवणात कोणते पदार्थ असावेत?
- ‘मॅग्नेशियम’ची कमतरता असल्यास होतात ‘या’ समस्या, असे ओळखा संकेत
- आरोग्याच्या ‘या’ समस्या किरकोळ असल्या तरी घ्या ‘डॉक्टरां’चा सल्ला
- हिरव्या पालेभाज्यांसह ‘लाल’ रंगाच्या भाज्यामध्येदेखील आहेत ‘ही’ पौष्टिक तत्व
- लक्ष केंद्रित का होत नाही ? जाणून घ्या यामागील कारणे
- ‘दीर्घायुषी’ होण्याचा मार्ग सापडला, जगा ‘असे’ आयुष्य
- सेक्स लाईफचा आनंद घेण्यासाठी रोज ‘हे’ पौष्टिक पदार्थ खा