नवी दिल्ली : वृत्तसंस्था – RRC Railway Recruitment-2021 | रेल्वे रिक्रूटमेंट सेलच्या माध्यमातून विविध झोनमध्ये अप्रेंटिस पदांवर भरती केली जाणार आहे. या पदभरती अंतर्गत पूर्व, पश्चिम, उत्तर मध्य आणि इतर ठिकाणी ही भरती (RRC Railway Recruitment-2021) केली जणार आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झाली असून उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज (Apply online) करायचे आहेत. रेल्वेकडून विविध झोनसाठी वेगवेगळे नोटिफिकेशन (Notification) जाहीर केले आहेत.
उत्तर मध्ये रेल्वेनं मागवले अर्ज
उत्तर मध्य रेल्वेनं (NCR) अप्रेंटिस पदाच्या भरतीसाठी (RRC Railway Recruitment-2021) पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत.
यासाठी उमेदवार, RRC प्रयागराजच्या अधिकृत वेबसाइटवर rrcpryj.org जाऊन ऑनलाइन अर्ज करु शकतात.
या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया 2 नोव्हेंबर 2021 पासून सुरु झाली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख (Deadline) 1 डिसेंबर 2021 आहे. या भरती प्रक्रियेत 1664 रिक्त जागा भरल्या जाणार आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
शैक्षणीक पात्रता आणि वयोमर्यादा
या पदांसाठी उमेदवाराने 10 वी पास असणे आवश्यक असून किमान 50 टक्के मार्क असणे आवश्यक आहे. याशिवाय संबंधित क्षेत्रातील ITI पदवी गरजेची आहे. अर्जासाठी वयोमर्यादा 15 ते 24 वर्षे निश्चित करण्यात आली आहे.
अर्जासाठी शुल्क
उमेदवाराला अर्ज करताना अर्ज फी म्हणून 100 रुपये भरावे लागतील. तर आरक्षित वर्ग/पीडब्ल्यूडी/महिला अर्जदारांना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही.
10 वीच्या गुणांच्या आधारे मेरिटद्वारे ही भरती केली जाणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवारांना 56 हजार 900 रुपये पगार दिला जाणार आहे.
Web Title : RRC Railway Recruitment-2021 | rrc railway recruitment 2021 notification application begins for 1664 apprentice posts apply now.
Pune Crime | पुण्यात स्नॅक सेंटरसाठी खर्च केलेले 2 लाख रुपये मागणार्यावर खंडणीचा गुन्हा