बहुजननामा ऑनलाईन टीम : सरकारी नोकरी करू इच्छिणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे, कारण रेल्वेमध्ये २६७ जागांची भरती करण्यात येणार आहे. ही रेल्वे भरती विभागाऐवजी रेल्वे रिक्रूटमेंट सेल (आरआरसी) ने केली आहे. उत्तर रेल्वेने मल्टी टास्किंग स्टाफची ११८ पदे रेल्वे रिक्रूटमेंट सेलने रिक्त केली आहेत. त्याचबरोबर पश्चिम रेल्वेमधील कनिष्ठ अभियंता व डेपो मटेरियल सुपरिटेंडंटच्या १४९ जागांसाठी ही भरती करण्यात आली आहेत. या पदांसाठी अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवार १५ ऑक्टोबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकतात. जाणून घ्या या संदर्भातील संपूर्ण माहिती.
उत्तर रेल्वे मल्टी टास्किंग स्टाफच्या ११८ पदांवर भरती करण्यात येणार आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ ऑक्टोबर २०१९ आहे. दहावी पास झालेले या पदासाठी अर्ज करू शकतील. उमेदवारांची वयोमर्यादा १८ ते ३३ वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे. उमेदवारांची निवड लेखी परीक्षेच्या आधारे केली जाईल.
रेल्वे भर्ती सेल कनिष्ठ अभियंता आणि डेपो मटेरियल सुपरिटेंडंटच्या पदांसाठी भरती करणार आहे. १४९ पदांवर ही भरती सुरु आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ ऑक्टोबर २०१९ आहे. अभियांत्रिकी लोक या पदांवर अर्ज करू शकतात. पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइट www.rrc-wr.com वर भेट देऊन अर्ज करू शकतात.
Visit : bahujannama.com