मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – Roshan Bhinder | बॉलीवूडमधून (Bollywood) एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. यामध्ये प्रसिद्ध निर्माती-दिग्दर्शिका (Producer-director) रोशन बिंदरला (Roshan Bhinder) वेब सीरिजसाठी (Web Series) घेतलेल्या 37 लाख रुपयांच्या फसवणुकीप्रकरणी (Crime News) वर्सोवा पोलिसांनी (Versova police) अटक केली आहे. अंधेरीतील यारीरोड-वर्सोवा परिसरात राहणाऱ्या एका 50 वर्षीय महिलेने यासंदर्भात तक्रार दाखल केली आहे.
तक्रारदार महिलेच्या इमारतीत अभिनेता हितेन तेजवानी (hiten tejwani) राहतो. तक्रारदार महिला, हितेन आणि रोशन बिंदर (Roshan Bhinder) या तिघांनी मिळून एक वेब सीरिज बनवण्याचा निर्णय घेतला होता. हितेनच्या सांगण्यावरून तक्रारदार महिलेने 37 लाख रुपये या वेब सीरिजसाठी गुंतवले होते.द अदर्स (डी कोड) नावाची ही वेब सीरीज पूर्ण झाल्यानंतर त्याचे हक्क हार्ड डिस्क, उल्लू डिजिटल प्रायव्हेट लिमिटेड चॅनेलला (Ullu Digital Private Limited Channel) विकून त्यातून मिळालेली रक्कम तिघे समान वाटून घेणार होते.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
त्यासाठी या तिघांच्या नावाने एक संयुक्त खाते उघडण्यात आले होते.
मात्र बँकेत जमा झालेल्या या पैशांचा रोशन बिंदर (Roshan Bhinder) यांनी परस्पर अपहार करुन त्यांची फसवणूक (Fraud) केल्याचा आरोप या महिलेने केला आहे
हि तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी रोशन बिंदरविरोधात गुन्हा (Crime News) दाखल करून त्यांना अटक केली आहे. रोशन या दिवंगत दिग्दर्शक गॅरी बिंदर (Gary Bhinder) यांच्या पत्नी आहेत. गॅरी हे एकता कपूरच्या (Ekta Kapoor) बालाजी टेलिफिल्म्समध्ये (Balaji Telefilms) काम करत होते.
Web Title : Roshan Bhinder | director of ekta kapoors television shows roshan bhinder arrested in a cheating case versova police station.
Mumbai Cyber Police | मुंबई पोलिसांकडून बनावट ‘ई-विमा पॉलिसी’ विकणार्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश