Rohit Pawar On Mahesh Landge | रोहित पवार यांचे महेश लांडगे यांना प्रत्युत्तर; म्हणाले – ‘धमक्या देऊ नका आम्ही काय राजकारणात गोट्या खेळायला आलो नाही’

November 8, 2024

पुणे: Rohit Pawar On Mahesh Landge | विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांकडून जोरदार प्रचार सुरु आहे. प्रचारादरम्यान सत्ताधारी-विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत. भोसरी विधानसभा मतदारसंघ (Bhosari Assembly Election 2024) चांगलाच चर्चेत आहे. या मतदारसंघात भाजपचे महेश लांडगे विरुद्ध शरद पवार गटाकडून (Sharad Pawar NCP) अजित गव्हाणे (Ajit Gavhane) असा सामना होणार आहे.

“माझा मूळ स्वभाव जागा करु नका. १३ दिवसांत निवडणूक होईल. माझ्या एकाही कार्यकर्त्याला त्रास दिला, तर २० तारखेनंतर माझा स्वभाव बदलणार. मी ‘धारकरी’ आहे, हे लक्षात ठेवा, असा इशारा भाजपचे उमेदवार आमदार महेश लांडगे यांनी दिला होता

त्यानंतर आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनीही महेश लांडगे यांना प्रत्युत्तर दिले आहे. “भोसरीत गुंडागर्दी, दडपशाही सुरू आहे. धमक्या देऊ नका, आम्ही राजकारणात गोट्या खेळण्यास आलो नाहीत”, असा इशाराही रोहित पवारांनी दिला आहे . त्यामुळे आता आगामी काळात भोसरीतील राजकारण पेटण्याची चिन्हे आहेत.

रोहित पवार म्हणाले, ” भोसरीत गुंडागर्दी, दडपशाही आहे. मतदारसंघात ताबा, मलिदा, रिंग गँग झाल्या आहेत. कार्यकर्त्यांना धमक्या दिल्या जात आहेत. व्यवसाय बंद केले जात आहेत. झेंडे, फलक काढले जातात. कार्यकर्त्यांना अडविले जाते. चेंबरपासून प्रत्येक कामात शहरात भ्रष्टाचार झाला आहे.

महेश लांडगे स्वतःला वारकरी म्हणता तर देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार पोलिसांनी वारकऱ्यांवर लाठीमार केला. तेव्हा त्यांना विरोध करण्याची हिम्मत लांडगे यांच्यात होती का? आमदार लांडगे हे दमदाटीशिवाय काहीच बोलले जात नाही. अहंकार आणि पैशाची मस्ती आहे. भाजपने महापालिका वाटून घेतली आहे. भाजपचा विकास म्हणजे नेत्यांचा विकास आहे.

ते पुढे म्हणाले, ” आम्हाला धमक्या देऊ नका, आम्ही राजकारणात गोट्या खेळण्यास आलो नाहीत. परिवर्तन करायचे हे भोसरीतील नागरिकांचे ठरलेले आहे. लोकांमध्ये आम्ही जेव्हा चर्चा केली त्यांचे मत आले की येथे लोकप्रतिनिधी नसून ताबा गँग कार्यरत आहे. येथे टक्केवारी मोठ्या प्रमाणात चालते.

फक्त स्वतःच्या जवळच्या लोकांना मदत करून ठेके मिळवायचे, त्यातून पैसा मिळवायचा एवढेच कुठेतरी चालू आहे. त्यामुळे परिवर्तन हे नागरिकांनी ठरवले आहे. एकाधिकारशाही मुळापासून संपवायची आहे”, असे रोहित पवार यांनी म्हंटले आहे.