Rohit Pawar On Ajit Pawar | सुनील तटकरे, धनंजय मुंडे हे भाजपमध्ये जातील, अजित पवार एकटेच राहतील – रोहित पवार

बारामती : – Rohit Pawar On Ajit Pawar | संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या बारामती लोकसभा निवडणुकीत (Baramati Lok Sabha) नणंद सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी भावजय सुनेत्रा पवार (Sunetra Ajit Pawar) यांचा दणदणीत पराभव केला. या विजयानंतर सध्या बारामतीत जोरदार जल्लोष साजरा केला जात आहे. बारामतीचा पराभव अजित पवारांना मोठ्ठा धक्का मानला जात आहे. लोकसभा निकालानंतर आता अजित पवार एकटेच राहितील अशी प्रतिक्रिया शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी दिली आहे.

रोहित पवार म्हणाले, लोकसभा निकालानंतर आता अजित पवार एकटेच राहतील. बाकी 12 ते 13 भाजपसोबत जातील आणि उर्वरित आमदार आमच्या सोबत येतील तर सुनील तटकरे (Sunil Tatkare), धनंजय मुंडे (Dhananjay Munde) हे तुम्हाला भाजपामध्ये जाताना दिसतील.

ज्यांनी टीका केली त्यांना घेऊ नये

अजित पवारांनी घरवापसी केली तर तुम्ही काय निर्णय घेणार याविषयी बोलताना रोहित पवार म्हणाले, जर ते येणार असतील तर मी पक्ष सोडेल असं मी म्हणालो नाही. पण माझी वेगळी भूमिका असेल हे मात्र मी म्हणालो आहे. त्यामुळे शरद पवारांवर ज्यांनी टीका केली त्यांना घेऊ नये. मला बच्चा म्हणाले मात्र आता मी मोठा झालोय हे त्यांना कळालं असेल.

अनेकांच्या झोपा उडाल्या

रोहित पवार म्हणाले, आम्हाला नेता बनण्याची घाई झाली नाही. भाजपने खाली राजकारण नेलं होतं. ते पुन्हा व्यवस्थित करायचं आहे. जेव्हा अनेक नेते धमक्या देत होते त्यावेळी आम्ही म्हणत होतो की जनता हे सर्व काही बघत आहे. अनेक लोकांच्या झोपा आता उडाल्या आहेत. महाराष्ट्राला पुन्हा एक नंबरच राज्य करायचे आहे. वंचित आमच्यासोबत आले तर नक्की आणखी वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं, असे रोहित पवार म्हणाले.