मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – प्रेम करणारे मुले – मुली आपले प्रेम व्यक्त करतात. आज प्रेमाचा गुलाबी दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवशी फक्त मुले – मुलीच नाही तर अनेकजण आपल्या मित्रांना देखील ‘व्हॅलेनटाईन डे’ च्या शुभेच्छा देतात. त्याचप्रमाणे राष्ट्रवादीचे तरुण नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे रोहित पवार यांनी सुद्धा ट्वीटरवरुन ‘व्हॅलेनटाईन डे’ च्या शुभेच्छा दिल्या आहे. मात्र शुभेच्छा देत त्यांनी केंद्र सरकारला टोमणा मारला.
रोहित पवार यांनी ट्विटरवरुन ‘व्हॅलेनटाईन डे’ च्या शुभेच्छा देत म्हंटले आहे की, आजचा दिवस स्वच्छ व खऱ्या अर्थाने निस्वार्थी प्रेम करणाऱ्यांचा दिवस आहे. आज तुम्ही आपल्या आवडत्या व्यक्तीसाठी छान स्वयंपाक करणार हे नक्की लक्षात असू द्या. गॅसचा दर 910 रुपये प्रती सिंलिंडर झाला आहे.’
हॅप्पी व्हॅलेन्टाईन डे!
हा दिवस स्वच्छ व खऱ्या अर्थाने निस्वार्थी प्रेम करणाऱ्यांचा आहे. आज तुम्ही आपल्या आवडत्या व्यक्तीसाठी स्वयंपाक करणार असाल तर लक्षात असूद्या… गॅसचा दर ९१० रुपये प्रती सिलिंडर झालाय.— Rohit Pawar (@RRPSpeaks) February 14, 2020
यावेळी रोहित पवारांनी केंद्र सरकारवर निशाणा साधून म्हणाले की, इंडियन ऑईलने सिलिंडरच्या किंमतीत जवळपास 150 रुपयांची वाढ केली आहे. विना अनुदानित 14 किलो गॅस सिलिंडरच्या किंमतीत 144. 50 रुपयांपासून 149 रुपयांपर्यंत वाढ जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना महागाईचे चटके सहन करावे लागणार आहे.