नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशभरात कोरोना व्हायरसचा संसर्ग पुन्हा एकदा वाढत आहे. कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. तर मृतांचा आकडाही वाढताना दिसत आहे. त्यावर रेमडेसिव्हिर इंजेक्शन प्रभावी ठरत असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर आता कोरोनाविरोधात लढण्यासाठी देशात औषधांचे कॉकटेल आले आहे. Roche व Cipla ने मिळून हे औषध लाँच केले आहे.
Roche & Cipla announce the arrival of the first batch of the new antibody cocktail drug (#Casirivimab and #Imdevimab) in India – aimed at reducing the risk of hospitalization and helping in early recovery in #Covid19 patients by halting progression. https://t.co/CynBXp6hbO pic.twitter.com/xtLl26RHKw
— Cipla (@Cipla_Global) May 24, 2021
औषध निर्माता कंपनी रोश इंडिया (Roche India) व सिप्लाने (Cipla) भारतात अँटिबॉडी कॉकटेल लाँच केले आहे. हे कोरोना विरूद्धच्या लढाईत पुढे येणार आहे. याच्या एका डोसची किंमत 59,750 रुपये आहे. Roche आणि Cipla ने जारी केलेल्या संयुक्त वक्तव्यामध्ये म्हटले की, अँटीबॉडी कॉकटेल (Casirivimab and Imdevimab) आता भारतात उपलब्ध आहे. याचा दुसऱ्या टप्प्यातील पुरवठा जूनच्या मध्यापर्यंत देशात येणार आहे. एकूण 2 लाख कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार केला जाऊ शकतो. 1 लाख पॅकचा एक पॅकेटमधून दोन रुग्णांवर उपचार करता येऊ शकतात.
Roche (Roche and Regeneron) कडून विकसित करण्यात आलेल्या कॉकटेल औषधात कासिरिविमॅब (Casirivimab) आणि इमदेविमॅब (Imdevimab) समावेश करण्यात आला आहे. जो भारतात आपातकालीन वापरासाठी मंजूरी देण्यात आली आहे. आरोग्य मंत्रालयानुसार, सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायजेशन (CDSCO) ने कोरोना महामारीकडे पाहता अँटिबॉडी ड्रगच्या डाटा निरीक्षण केले होते. अमेरिकेत याच्या आपातकालीन वापरासाठी परवानगी देण्यात आली आहे.