बहुजननामा ऑनलाईन – आरजे मलिष्का नेहमी आपल्या हटके कामामुळे चर्चेत असते. आता पुन्हा एकदा मलिष्का चर्चेत आली आहे. यामागील कारणही तसेच आहे. पुन्हा एकदा मलिष्काने मुंबईतील खड्ड्यांवर गाणे शेअर केले आहे. या गाण्याला मलिष्काने ‘चांद जमीन पर आया’ असे नावही दिले आहे. २. ४० मिनिटांचं हे गाणं मलिष्काने फेसबुक आणि इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर होताच केवळ दोन तासातच व्हायरल झाला आहे. याआधी मलिष्काने सोनू तुला बीएमसीवर भरोसा नाय का ? म्हणणाऱ्या गाण्याच्या आधारे बीएमसीच्या कामावर पुन्हा एकदा टीका करत हटक्या पद्धतीचे गाणं सादर केला आहे.
बॉलिवूडमधल्या गाण्याचा वापर मलिष्काने या गाण्यात केला आहे. या गाण्याचं जास्त आकर्षण म्हणजे मलिष्काने हे गाणं शूट करण्यासाठी चक्क रस्त्यावर उतरली आहे. रस्त्यावर उतरून मलिष्काने या गाण्याचं शूट केलं आहे. यामध्ये मलिष्का लाल साडी नेसून नववधूसारखी नटली आहे. यावेळी तिने रस्त्यावरील खड्डे दाखवत रस्त्याची दशा दाखवली आहे. गाण्यात मलिष्का रस्त्यावरील खड्डे दाखवत खड्ड्याच्या आजूबाजूला फिरताना दिसत आहे. भारत देश चांद्रयानाच्या माध्यमातून चंद्रावर पोहोचला तरीही मुंबईतल्या खड्ड्यांची समस्या जशीच्या तशी आहे असं मांडण्याचा मलिष्कानं प्रयत्न केला आहे.
याआधीही मलिष्काने सोनू तुला बीएमसीवर भरवसा नाही काय ,म्हणत मुंबईतील खड्ड्यांची परिस्थिती मांडली होती. हे गाणं जबरदस्त हिट झालं होत. त्यानंतर मलिष्काने सैराट सिनेमातलं झिंग झिंगाट गाण्याचा वापर करत मुंबई खड्ड्यात गेली असं गाणं तयार केलं होत. त्यानंतर आता मलिष्काने हे गाणं तयार केला आहे. आणि हे गाणं देखील सुपरहिट झालं आहे. पण आता मलिष्काच्या या गाण्यावर बीएमसी कसे उत्तर देणार हे पाहण्यासारखे असणार आहे.