मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत प्रकरणाने आता एक नवीन वळण घेतले आहे, सुशांतच्या वडिलांनी अभिनेत्री आणि सुशांतची माजी गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीविरुद्ध पटनातील राजीवनगर पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल केली आहे. सुशांतच्या वडिलांनी रियावर सुशांतला प्रमाचा जाळ्यात अडकवून त्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप केला आहे.
दरम्यान, या प्रकरणाबद्दल आणखी एक मोठी माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेत्री रिया चक्रवर्ती आता सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली आहे. तिचे वकील सतीश मनेशिंदे यांनी सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. त्यानुसार हे खटला मुंबईत वर्ग करण्याची चर्चा आहे.