मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – सोशल मीडियावर सध्या दिवंगत नेते विलासराव देशमुख यांच्या दोन्ही मुलांच्या रितेश आणि अमित देशमुख यांच्या शेतजमीनाचा ७/१२ उतारा व्हायरल होत आहे. लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने अमित देशमुख व रितेश देशमुख यांना लातूर तालुक्यातील सारसा येथील ११ एकर जमिनीवर चार कोटी ७० लाख रुपयांचे कर्ज दिल्याची कागदपत्रे सोशल मीडियावर व्हायरल झाली. उताऱ्यावरील कर्जाच्या आकड्यामुळे या दोघांनाही ट्रोल करण्यात येत आहे. मात्र, या उताऱ्याबाबत रितेश देशमुखने ट्विटरच्या अध्यमातून स्पष्टीकरण दिलं आहे.
‘मी व अमित देशमुखने कोणते कर्ज घेतलेच नाही’, असं रितेशने स्पष्ट केलं आहे. मी व अमितने कुठलेही कर्ज घेतले नाही, सोशल मीडियावर ही कागदपत्रे चुकीच्या उद्देशाने पसरवली जात आहेत. त्यामुळे कुठल्याही कर्जमाफीचा प्रश्नच येत नाही, असे रितेशने म्हटले आहे. तसेच, कृपया अशा प्रकारच्या अफवा पसरवू नका, असेही रितेशने म्हटले होते.
Dear @madhukishwar Ji, The said paper in circulation is with malafide motive. Neither me nor my brother @AmitV_Deshmukh have availed any loan as mentioned in the paper posted by you. Hence, there is no question of any loan waiver whatsoever. Please don’t be misled. Thank you. https://t.co/yCfxNt2ZRm
— Riteish Deshmukh (@Riteishd) December 3, 2019
सामाजिक कार्यकर्त्या मधू किश्वर यांनीही देशमुख कुटुंबीयांच्या शेतजमिनीसंदर्भातील ही कागदपत्रे ट्विट करुन रितेश देशमुखला लक्ष्य केलं होतं. रितेशने मधू किश्वर यांना टॅग करुन या कागदपत्रांसंदर्भात स्पष्टीकरण दिलं आहे. दरम्यान, रितेशच्या ट्विटनंतर मधू यांनी ते फोटो आणि ट्विट डिलीट केले.
Visit : bahujannama.com