• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण : कथित 12 ऑडिओ क्लिप्समुळे मंत्री राठोड यांच्यावरील संशयाचे वातावरण ‘गडद’, राजीनाम्यासाठी वाढतोय दबाव

by Jivanbhutekar
February 14, 2021
in क्राईम, राजकारण
0

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – कथित १२ ऑडिओ क्लिप्स सोशल मीडियात व्हायरल झाल्याने पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाला आता वेगळे वळण लागले आहे. या ऑडिओ क्लिप्समुळे राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांच्याभोवतीचे संशयाचे वातावरण अधिक गडद झाले आहे. दरम्यान, पूजा चव्हाण युवतीच्या आत्महत्येप्रकरणी मंत्री राठोड यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी भाजपने केली आहे. तसेच व्हायरल झालेल्या क्लिपमधील आवाज त्यांचाच आहे का, याची फोरॅन्सिक लॅबमध्ये चाचणी करण्याची मागणीही भाजपने केली. या घटनेपासून मंत्री राठोड यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते ‘नॉट रिचेबल’ आहेत.

पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणात रोज नवनवीन माहिती समोर येत आहे. ज्या १२ ऑडिओ क्लिप्स व्हायरल झाल्या आहेत त्यावरून वनमंत्री राठोड चांगलेच अडचणीत आले आहेत. राठोड हे सध्या ‘नॉट रिचेबल’ आहेत. ते मुंबईतील बंगल्यावर नाहीत. यवतमाळच्या घरीदेखील नाहीत. त्यांचे मोबाइल स्विच ऑफ आहेत. त्यांचे पीए, पीएस फोन घेत नाहीत, घेतलाच तर उडवाउडवीची उत्तरे देतात. दोन दिवसांपूर्वीच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीलाही ते हजर नव्हते. आपल्या खात्याच्या बैठका व कार्यक्रमही त्यांनी रद्द केले आहेत. त्यामुळे उलटसुलट चर्चेला ऊत आला आहे. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ते मुंबईतच असल्याचे समजते.

दरम्यान राठोड यांच्यावरील आरोपांबाबत बोलण्यास शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी टाळले असून त्याबाबत मुख्यमंत्रीच काय ते सांगतील, असे ते म्हणाले. तर झालेली घटना दुर्दैवी आहे. पण थेट संजय राठोड यांचे नाव घेणे योग्य ठरणार नाही, माहिती घेतल्यानंतरच बोलणे योग्य राहील. दरम्यान, पूजाच्या बहिणीने टाकलेल्या फेसबुक पोस्टचीही खूप चर्चा आहे, असे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

‘ती’ दोन महिन्यांची गरोदर ?
१२ ऑडिओ क्लिप्समधून रोज नवनवीन माहिती समोर येत आहे. एका क्लिपमध्ये एक तरुणी दोन महिन्यांची गरोदर असल्याचे, प्रेगनन्सी टेस्ट केली असल्याचे एक जण सांगतो. त्यावर, तिने तर मला गोळ्या घेतल्या असल्याचे सांगितले होते. म्हणजे ती माझ्याशी खोटं बोलली, माझा विश्वासघात केला, असे दुसरा म्हणतो. या १२ ऑडिओ क्लिप्स विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस महासंचालकांकडे पाठविल्या आहेत.

तिच्या डोक्यातून सुसाईडचे काढा
तिच्या डोक्यातून सुसाईडचं तेवढं काढा, आत्महत्या हा इलाज आहे का? … हो! मी तिला समजावून सांगतोच आहे, तू पण समजावून सांग, काही गडबड व्हायला नको, असे संवाद या एका क्लिपमध्ये आहेत. काहीही कर, हॉस्पिटलमध्ये दोरीने चढून खिडकीतून जा पण तिचा मोबाईल आधी ताब्यात घे, अशी सूचना कथित मंत्री करीत असल्याच्या संवादाचीही क्लिप आहे.

अरुण नावाची एक व्यक्ती एका क्लिपमध्ये म्हणते की, प्रकरण वाढले तर राज्यात बोभाटा होईल. तुम्ही दोघेही नामवंत आहात. त्यावर कथित मंत्री त्याला, प्रकरण मिटव. काहीही कर नाहीतर मला संन्यास घ्यावा लागेल, माझ्यावर आत्महत्या करण्याची पाळी येईल, असे सांगतो.

Tags: Audio ClipsForest Minister Sanjay Rathodforest minister sanjay rathorespooja chavan suicidePooja Chavan suicide caseresignationsocial mediaऑडिओ क्लिप्सपूजा चव्हाण आत्महत्यापूजा चव्हाण आत्महत्या प्रकारणवनमंत्री संजय राठोडसोशल मीडिया
Previous Post

उमर आणि फारूक अब्दुल्ला नजरबंद, महबूबा मुफ्ती यांना पुलवामा येथे जाण्याची परवानगी नाही

Next Post

ऑनलाईन ड्रायव्हिंग परवाना मिळवण्यासाठी केवळ 6 प्रश्नांची द्यावी लागतील उत्तरे

Next Post
Driving licence

ऑनलाईन ड्रायव्हिंग परवाना मिळवण्यासाठी केवळ 6 प्रश्नांची द्यावी लागतील उत्तरे

क्राईम

Pune News : लष्करातून सुभेदार पदावरून निवृत्त झालेल्याने पैशाच्या व्यवहारातून 33 वर्षीय तरुणाचं केलं अपहरण, सोलापूर रस्त्यावर खून ?

March 2, 2021
0

पुणे : बहुजननामा ऑनलाइन - लष्करातून सुभेदार पदावरून निवृत्त झालेल्याने पैशाच्या व्यवहारातून 33 वर्षीय कार चालकाचा खून करण्याच्या उद्देशाने अपहरण...

Read more

Coronavirus : राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 7863 नवे रुग्ण, 6332 जणांना डिस्चार्ज

March 2, 2021
Vitthal-Panbhare

वाशिम ! बहीणीच्या डोक्यावर अक्षता पडताच तरुणाचा सपासप वार करुन खून

March 2, 2021
hathras

हाथरस प्रकरण : मुख्य आरोपी गौरव ‘सपा’शी संबंधित, पीडिता म्हणते – ‘दहशतवादी आहे तो’

March 2, 2021
pooja-chavan-sanjay-rathod-dhananjay-munde

संजय राठोडांनंतर आता धनंजय मुंडेंना द्यावा लागणार राजीनामा ?

March 2, 2021
chitra-wagh-1

चित्रा वाघ यांनी मॉर्फ केलेल्या त्या फोटोविरोधात केली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल

March 2, 2021
pune corona

Coronavirus : पुण्यात गेल्या 24 तासात 688 ‘कोरोना’चे नवीन रुग्ण, 6 जणांचा मृत्यू

March 2, 2021
platform-ticket

मध्य रेल्वेचा दणका ! प्लॅटफॉर्म तिकीट दरात केली 5 पटीने वाढ

March 2, 2021
team-india

इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेला भारताचा ‘हा’ मुख्य खेळाडू मुकणार

March 2, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Chitra Wagh
मुंबई

पवारसाहेब तुमची खूप आठवण येतेय ; चित्रा वाघ यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या – ‘होय, शरद पवार माझा बापच आहे,…’

February 27, 2021
0

...

Read more

PM Kisan Yojana : पीएम किसान योजनेत मोठा बदल, 8 वा हप्ता येतो; ‘या’ पध्दतीनं तपासा यादीमधील नाव

2 days ago

मध्य रेल्वेचा दणका ! प्लॅटफॉर्म तिकीट दरात केली 5 पटीने वाढ

6 hours ago

मरता-मरता 5 जणांना सेवारामनं दिलं जीवनदान अन् झाला ‘अमर’

11 hours ago

Pune News : संचारबंदीची कडक अंमलबजावणी सुरु, तब्बल 42 ठिकाणी नाकाबंदी करून वाहनांची तपासणी

6 days ago

काय सांगता ! होय, पतीला आत्महत्या करण्यास केले प्रृवत्त, नेटवर्किंग मार्केटिंगच्या दोघांवर FIR

5 days ago

हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीच्या नाशिक डिव्हिजनमध्ये टर्नर पासून ते इलेक्ट्रीशिअन पर्यंतच्या 475 पदांसाठी भरती

5 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat