नवी दिल्ली : वृत्त संस्था – रियान शगडेन एक पॉपुलर मॉडल (model ) आहे आणि इंस्टाग्राम(instagram)वर खुप अॅक्टिव्ह असते. आपले फोटोज आणि पोस्टमुळे अनेकदा तिला ट्रोल्सचा सुद्धा सामना करावा लागतो. रियानची एक इंस्टाग्राम पोस्ट सोशल मीडियावर खुप वायरल होत आहे, ज्यामध्ये तिने एका व्यक्तीला खुलेआम सुनावले आहे. ग्लॅमर मॉडलने उन्माद करणार्या ट्रोलरला इंस्टाग्रामवर रागाने लिहिलेल्या एका पोस्टमध्ये जोरदार चपराक दिली आहे.
34 वर्षीय रियानने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर आपल्या एका श्रीमंत चाहत्याची पोलखोल केली असून त्याने कशा प्रकारची घाणेरडी ऑफर दिली होती ते सांगितले आहे. आपल्या सव्वाचार लाख फॉलोअर्ससाठी पोस्ट शेयर करत मॉडलने लिहिले, मागील काही दिवसांपासून काही ढोंगी लोकांची प्रपोजल माझ्या इनबॉक्समध्ये येत आहेत. बॉल बॅग पिक्सपासून फुल ऑन बी-होल पिक्सपर्यंत.
एका मेसेजचा उल्लेख करताना रियानने लिहिले, एका श्रीमंत उद्योगपतीने तर मला मेसेज करून हे सुद्धा म्हटले की, तो माझ्या सोबत एक रात्र घालवण्यासाठी 2 लाख पाऊंड्स म्हणजे सुमारे 2 कोटी देण्यास तयार आहे. आणि आणखी एकाने कुणाच्या तरी पत्नी सोबत संबंध ठेवणे आणि चित्रिकरण करण्याचा प्रस्ताव दिला. मला या गोष्टींमध्ये रस नाही आणि अशाप्रकारच्या ऑफर देणार्यांनी आपल्या मर्यादेत राहावे.
मॉडल रियान आपला पती ओलिवर मेलर सोबत राहते आणि सध्या मुलाचे प्लॅनिंग करत आहे. मॅनचेस्टरची रहिवाशी रियानने 40 वर्षीय ओलिवरसोबत विवाह केला होता. लॉकडाऊनच्या अगोदर रियानने सांगितले होते की, ती दुखी आहे कारण तिच्या आयव्हीएफचा दुसरा टप्पा अपयशी ठरला आहे. मात्र, नंतर तिने सांगितले की, दुसर्या टप्प्यातील उपचार यशस्वी झाला आहे.