Revise ITR Filing | शेवटच्या दिवशी घाईघाईत भरला आयटीआर, नंतर समजले की चूक झाली, आता कशी करायची दुरूस्ती आणि केव्हापर्यंत संधी?
नवी दिल्ली : Revise ITR Filing | इन्कम टॅक्स रिटर्न (IT Return) भरण्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे 31 जुलै रोजी 50 लाखापेक्षा जास्त रिटर्न दाखल झाले. अशावेळी घाईघाईत एखादी चूक झाली असेल तर ती दुरूस्त करण्याची जबाबदारी तुमची आहे. जर तुमच्याकडून आयटीआरमध्ये एखादी चूक झाली असेल तर ती दुरूस्त करण्याची पद्धत काय आहे आणि केव्हापर्यंत यासाठी प्राप्तीकर विभाग संधी देतो, ते जाणून घेऊया… (Income Tax Department)
आयटीआर घाईत भरताना साधारणपणे चुकीचा बँक अकाउंट नंबर भरणे, चुकीच्या पद्धतीने रिफंड क्लेम करणे, व्याजाच्या उत्पन्नाची चुकीची माहिती देणे अथवा योग्य हिशोब न देणे, अशा चूका दुरूस्त करण्यासाठी आता रिवाईज आयटीआर भरावा लागेल, ज्यामध्ये दुसर्यांदा चूक दुरूस्त करण्याची संधी मिळते.
रिवाईज आयटीआर भरण्यासाठी कोणतेही शुल्क लागत नाही, 31 जुलैनंतर रिटर्न भरला असेल तरी शुल्क द्यावे लागत नाही. प्राप्तीकर विभाग सेक्शन 139(5) अंतर्गत भरलेल्या आयटीआरमधील चुका सुधारण्याची संधी देतो.
जर आयटीआर व्हेरिफाय केला नसेल तर…
आयटीआर डेडलाईनच्या आत भरताना तो व्हेरिफाय केला नसेल तर रिवाईज आयटीआर भरण्याची गरज नाही. त्याऐवजी आधी भरलेला आयटीआर डिलीट करून त्या ठिकाणी नवीन रिटर्न दाखल करू शकता. यावर कोणतेही विलंब शुल्क लागत नाही.
कधीपर्यंत भरू शकता रिवाईज आयटीआर
इन्कम टॅक्स विभाग करदात्यांना रिवाईज आयटीआर भरण्यासाठी 31 डिसेंबरपर्यंत संधी देते. या तारखेपर्यंत रिवाईज आयटीआर तुम्ही कितीही वेळा भरू शकता.
Comments are closed.