नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतात जर कुणी प्राइव्हेट सेक्टर अथवा असंघटीत क्षेत्रात काम करत असेल तर त्यांना आपल्या पेन्शनची तयारी स्वत:लाच करावी लागते. त्यांच्याकडे पेन्शन स्कीम निवडण्याचा पर्याय आहे. तर सरकारी नोकरी करणार्यांना नॅशनल पेन्शन सिस्टममध्ये गुंतवणूक करणे अनिवार्य असते. या कारणामुळे खासगी क्षेत्रात काम करणारे लोक आपल्या भविष्याची चिंता तेव्हा सुरू करतात जेव्हा त्यांचे वय 40 पेक्षा जास्त झालेले असते. जर तुम्ही सुद्धा यापैकीच असाल तर चिंता करण्याचे कारण नाही. 40 व्या वयातही तुमच्याकडे काही पर्याय आहेत, ज्यामाध्यमातून तुम्ही रिटायरमेन्टचे प्लॅनिंग करू शकता.
एनपीएस स्कीममध्ये गुंतवणूक केल्याने होईल काम
जर तुमचे वय 40 असेल आणि अजूनपर्यंत तुम्ही अनेक आर्थिक जबाबदार्यांमुळे आपल्या रिटायरमेंटकडे लक्ष दिले नसेल. तर तुम्ही आपल्या रिटायरमेंटसाठी सुमारे 20 लाख रुपये जमवू शकता. आणि इपीएसद्वारे तुम्हाला पेन्शन मिळू शकते. तुम्ही 25 हजार रूपये महिना व्यवस्था करू शकता तर तुम्ही यासाठी एनपीएस स्कीममध्ये गुंतवणूक करू शकता.
दर महिना 10 हजार रुपयांची करावी लागेल बचत
जर तुम्ही वयाच्या 40 व्या वर्षी नॅशनल पेन्शन सिस्टममध्ये सहभागी होत असाल तर पुढील 20 वर्षात तुम्हाला दरमहिना 10 हजार रुपये गुंतवणूक करावी लागेल. या 20 वर्षात तुम्हाला एकुण 24 लाख रुपयांची गुतवणूक करता येईल. एनपीएसवर 8 टक्केच्या हिशेबाने 60 व्या वयात तुमची एकुण पेन्शन वेल्थ 58 लाख 90 हजारच्या जवळपास होईल. यात 34.90 लाख रुपये व्याज असेल. तर, सुमारे 7.20 लाख रुपये तुमची कर बचत होईल.
यामुळे तुम्हाला 25 हजार रुपयांची पेन्शन तुमच्या एकुण पेन्शन वेल्थमधून 65 टक्के फंडचा वापर एन्युटी खरेदी करण्यासाठी करू शकता. तर ती किंमत 38.28 लाख रुपये होईल. जर हा एन्युटी दर 8 टक्के असेल तर 60 व्या वयानंतर तुम्हाला प्रत्येक महिन्याला सुमारे 25,500 रुपये पेन्शन मिळू शकते. एकुण मुल्य सुद्धा सुमारे 20.61 लाख रुपये होईल, जे तुम्ही मॅच्युरिटीच्यावेळी काढू शकता. तुम्हाला याकडे लक्ष द्यावे लागेल की एन्युटीने पेन्शनची स्कीम निर्धारित होईल. एकुण पेन्शन वेल्थच्या कमीतकमी 40 टक्के रक्कमेचे एन्युटी खरेदी करणे जरूरी असते.
Visit : bahujannama.com