पुणे : बहुजननामा ऑनलाइन – कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षा रद्द ( class x ) करण्यात आल्या आहे. यावर्षी मूल्यमापन पद्धतीवर निकाल तयार करण्यात येणार आहे. मात्र या निकालाची १५ जुलैपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. राज्य मंडळाच्या अधिकाऱयांच्या ( class x ) मतानुसार येत्या दोन दिवसात निकाल तयार करण्यासबंधीचा आराखडा तयार करण्यात येईल आणि त्यानंतर पुढील कार्यवाही होईल याला १५ जुलै पर्यंतच कालावधी लागेल.
दहावीचा निकाल ( class x ) हा नववी आणि दहावीतील अंतर्गत मूल्यमापनाच्या गुणांच्या आधारे प्रसिद्ध केला जाणार आहे. त्यामुळे शाळांकडून प्रत्येक विद्यार्थ्यांचे गुण मागवले जाणार आहेत. ऑनलाइन पद्धतीने एका विशिष्ट आराखड्यात शाळांनी हे गुण भरून द्यायचे आहेत. राज्य मंडळाकडून हा आराखडा तयार केला जात असून आज किंवा उद्या तो प्रसिद्ध केला जाईल.
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील म्हणाले की, दहावीचा निकाल देण्याची तयारी सुरू झाली आहे. येत्या दोन दिवसात निकालासाठी आवश्यक असणारा आराखडा प्रसिद्ध केला जाईल. शाळांनी या आराखड्यात सांगितल्यानुसार विद्यार्थ्यांचे गुण भरायचे आहेत. त्यानंतर शाळांकडून प्राप्त होणाऱ्या गुणांच्या आधारे १५ जुलैपर्यंत दहावीचा निकाल लागले अशी अपेक्षा आहे.
कृपया हे देखील वाचा:
तुमच्या स्मार्टफोनवर ‘गुगल’ कोणत्या गोष्टींना करत आहे रेकॉर्ड, मिनिटात ‘या’ पद्धतीने जाणून घ्या
लठ्ठपणाने पीडित लोकांमध्ये लाँग कोविड इफेक्टचा धोका जास्त, जाणून घ्या काय सांगतो रिसर्च