नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मशिदीवरील भोंग्यासंदर्भात सौदी अरेबियाने सरकारने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. भोंग्याचा वापर कमी करा असे निर्देश तेथिल सरकारने दिले आहेत. इस्लाम धर्मासंबधी खात्याचे मंत्री अब्दुललतीफ अल शेख यांनी हा आदेश जारी केला आहे. सौदी सरकारने ट्विटच्या माध्यमातून नव्या नियमांची माहिती जनतेला दिली आहे. नव्या नियमांनुसार भोंग्याचा वापर फक्त अजान आणि इकामतसाठीच करता येणार आहे. या निर्णायामुळे कट्टरपंथीय मुस्लीम संतप्त झाले आहेत. मोहम्मद बिन सलमान हे सौदी अरेबियाचे राजपूत्र असून त्यांनी त्याच्या देशाचा कट्टरवादी चेहरा बदलून उदारमतवादी चेहरा धारण करण्याचे धोरण हाती घेतले आहे. भोंग्याबाबतचा हा निर्णय त्याचाच एक भाग आहे.
सौदी सरकारने दिलेल्या आदेशात लाऊडस्पीकरचा आवाज हा त्याच्या क्षमतेच्या 1/3 इतकाच असावा असे म्हटले आहेत. जो कोणी नियमांचे उल्लंघन करेल त्याच्या विरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा दिला आहे. भोंग्याच्या आवाजामुळे त्रास होत असल्याच्या तक्रारी अनेक नागरिकांनी केल्या होत्या. या आवाजाचा लहान मुले आणि ज्येष्ठांना अधिक त्रास होत असल्याचे तक्रारकर्त्यांनी म्हटले होते. बहुतांश नागरिकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. तर काहीनी सोशल मिडियावर कॅफे आणि रेस्टारंटमधील आवाज कमी करा अशी मागणी करत हॅशटॅग मोहीम सुरु केली आहे. या निर्णयाला विरोध करणारे हे सौदी अरेबियाचे शत्रू असल्याचे अलब्दुल लतीफ म्हटले आहे.
आरोग्यासह सौंदर्याचीही विशेष काळजी घ्या
उस्मानाबाद पोलिसांनी पकडला तब्बल सव्वा कोटींचा गांजा, चौघे फरार
उपमुख्यमंत्री अजित पवारांनी उद्घाटन केलेलं लसीकरण केंद्र बंद असल्यानं नागरिकांमध्ये नाराजी