मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – उपमुख्यंमत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि शिवसेना नेते, परिवहन मंत्री अनिल परब (Anil parab) यांची केंद्रीय अन्वेषण विभागामार्फत (CBI) चौकशी करण्याची मागणी ठराव आज भाजपाच्या राज्य कार्यकारिणी बैठकीत (BJP state executive meeting) मंजूर करण्यात आला आहे. भाजपाच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत आज (24 जून) रोजी हा महत्त्वपूर्ण ठराव (Resolution) मंजूर केला आहे. पोलीस दलातून बर्खास्त केलेले सचिन वाझे (Sachin Waze) यांच्या लेटरच्या आधारावर भाजपाने CBI चौकशीची मागणी ठरवा मंजूर केला आहे.resolution bjp state executive meeting demanding cbi inquiry against deputy chief minister ajit pawar
Join our WhatsApp Group, Telegram, and facebook page for every update
फेब्रुवारी महिन्यात घडलेली घटना म्हणजे, अंबानी यांच्या निवासस्थानी आढळून आलेली स्फोटकांनी भरलेली गाडी आणि ठाण्याचे प्रसिद्ध व्यापारी मनसुख हिरेन (Mansukh Hiren) हत्या या दोन्ही प्रकरणामध्ये सचिन वाझे (Sachin Waze) आता कोठडीत आहेत. स्फोटकांनी आढळून आलेली कार हा कट वाझेंचा होता असा आरोप वाझेंवर आहे. या दोन्ही प्रकरणाच्या तपासात राष्ट्रीय तपास संस्थाने (NIA) सचिन वाझेलाच (Sachin Waze) अटक केली. यानंतर वाझेल पुन्हा पोलीस सेवेत घेण्याच्या आरोपावरून माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Parambir Singh) यांची करण्यात आली. यानंतर परमबीर सिंग (Parambir Singh) यांनी एक लेटरबॉम्ब टाकला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहलेले प्रसारित झाले. त्यामध्ये माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर गंभीर आरोप होते.
या दरम्यान, देशमुख यांच्या या आरोपांबाबत मुंबई हाय कोर्टात आव्हान देण्यात आले. यावरून कोर्टाने देशमुखांविरोधात प्राथमिक CBI तपासाचे निर्देश दिले. यावरून अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. सध्या या प्रकरणामध्ये तत्कालीन एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मांना (Pradeep Sharma) अटक झालीय. आता मात्र, अजित पवारांच्या (Ajit Pawar) सीबीआय चौकशीची मागणी करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला आहे.
Web Titel : resolution bjp state executive meeting demanding cbi inquiry against deputy chief minister ajit pawar
Join our WhatsApp Group, Telegram, and facebook page for every update